ऑनलाईन टास्कचे काम सांगून १४ लाख ८६ हजारांची फसवणूक

By धीरज परब | Published: July 26, 2023 08:36 PM2023-07-26T20:36:14+5:302023-07-26T20:36:21+5:30

भाईंदर पश्चिमेच्या क्रॉस गार्डन जवळील बाकोल स्ट्रीट वर राहणाऱ्या अंकित भन्साळी यांना टेलिग्रामवर अनोळखी लिंक आली होती.

Fraud of 14 lakh 86 thousand by claiming online task work | ऑनलाईन टास्कचे काम सांगून १४ लाख ८६ हजारांची फसवणूक

ऑनलाईन टास्कचे काम सांगून १४ लाख ८६ हजारांची फसवणूक

googlenewsNext

मीरारोड - टेलिग्रामवर आलेली अनोळखी लिंक क्लिक करून पैश्यांच्या आमिषाने  रेटिंग देणे , टास्क पूर्ण करण्याच्या कामासाठी पैसे भरत गेलेल्या भाईंदरच्या इसमाची तब्बल १४ लाख ८६ हजार रुपयांना फसवणूक झाली आहे . 

भाईंदर पश्चिमेच्या क्रॉस गार्डन जवळील बाकोल स्ट्रीट वर राहणाऱ्या अंकित भन्साळी यांना टेलिग्रामवर अनोळखी लिंक आली होती. ती क्लिक केली असता रेटिंग चे काम करा व दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगले पैसे मिळतील असे आमिष दाखवण्यात आले . अंकित यांनी १० हजार भरले असता त्यांना १३ हजार परत आले . 

त्या नंतर टास्क व पैसे परत मिळतील आदी कारणांनी त्यांनी विविध खात्यात १४ लाख ८६ हजर रुपये भरले. मात्र पैसे परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सायबर शाखे कडे तक्रार केली . सायबर शाखेच्या तपासात त्यांनी भरलेले पैसे हे वसई , गोरेगाव , तेलंगणा , लखनऊ व गुजरातच्या साबरकांठा आणि जामनगर भागातील विविध बँकच्या क्रेडिट कार्ड खात्यात गेल्याचे आढळून आले आहे . भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी २५ जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे . 

Web Title: Fraud of 14 lakh 86 thousand by claiming online task work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.