बँकेच्या नावाऐवजी स्वतःच्या नावे धनादेश वटवून रिक्षा चालकाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 05:40 PM2023-03-04T17:40:13+5:302023-03-04T17:40:49+5:30

मीरारोड - रिक्षा चालकाच्या घरावरील कर्ज बँकेच्या व्यवस्थापकास पैसे देऊन कमी करायला लावतो सांगून तडजोडीच्या रकमेचा धनादेश बँकेऐवजी स्वतःच्या ...

Fraud of a rickshaw puller by encashing a check in his own name instead of the bank's name | बँकेच्या नावाऐवजी स्वतःच्या नावे धनादेश वटवून रिक्षा चालकाची फसवणूक

बँकेच्या नावाऐवजी स्वतःच्या नावे धनादेश वटवून रिक्षा चालकाची फसवणूक

googlenewsNext

मीरारोड - रिक्षा चालकाच्या घरावरील कर्ज बँकेच्या व्यवस्थापकास पैसे देऊन कमी करायला लावतो सांगून तडजोडीच्या रकमेचा धनादेश बँकेऐवजी स्वतःच्या खात्यात वटवून फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाविरोधात भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदर पश्चिमेस अशोक नगर मध्ये राहणारे ५२ वर्षीय करुणाकर हेगडे हे रिक्षा चालवतात. त्यांना त्यांची सदनिका विकायची असल्याने प्रकाशदीप पटणी दलालाने गिर्हाईक आणले व व्यवहार ठरला. परंतु सदनिकेवर एसबीआय बँकेचे १४ लाखांचे कर्ज असल्याने पटणी याने बँक व्यवस्थापक धवल चुनेकर आपल्या ओळखीचे असून त्याला पैसे देऊन साडेआठ लाखांवर तडजोड करून घेऊ सांगितले . 

हेगडे यांनी कर्ज तडजोडीसाठी नातलगां कडून ५ लाख तयार त्यांची पत्नी जैन मंदिरात जेवण बनवण्याचे काम करते तेथून ४ लाख उसने घेऊन भाईंदरच्या बेसिन कॅथोलीक बँकेत हेगडे यांनी त्यांच्या खात्यात भरले. पटणी याने बँकेत ओळखीचा मॅनेजर धवल येणार असल्याचे व त्याला धनादेश द्यायचा आहे सांगून हेगडे यांना बोलावले. तेथे धवल आला असता त्याच्या सांगण्या नुसार हेगडे यांनी साडे आठ लाखांचा धनादेश पटणीकडे दिला. धवल याला कर्ज तडजोडीची रक्कम कमी केली म्हणून २० हजार हेगडे यांनी दिले. 

पटणी याने धनादेश वर बँकेचे नाव टाकण्या ऐवजी युअर सेल्फ असे लिहले असल्याचा संशयास्पद प्रकार हेगडे यांच्या मुलाच्या लक्षात आल्याने त्याने बँकेतून दुसऱ्या दिवशी ५ हजार काढायला लावले. जेणे करून खात्यात पैसे कमी असल्याने पटणीकडे दिलेला धनादेश वटणार नाही. मात्र पटणी याला त्याची माहिती मिळाली व त्याने शब्बीर याला हेगडे यांच्या खात्यात ५ हजार रुपये भरायला लावले व नंतर तो साडेआठ लाखांचा धनादेश स्वतःच्या खात्यात वटवला. 

आपली फसवणूक झाल्याचे पाहून हेगडे यांनी पटणीकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला असता २ लाख परत केले. मात्र उर्वरित रक्कम तो देत नसल्याने हेगडे यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिसांनी १ मार्च रोजी पटणी, धवल व शब्बीर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: Fraud of a rickshaw puller by encashing a check in his own name instead of the bank's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.