बंगल्याला भुलले अन् एक कोटी गमावून बसले! नेमकं प्रकरण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 09:01 AM2022-04-09T09:01:56+5:302022-04-09T09:02:06+5:30

बंगला बांधून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील पाच जणांची एक कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला. कापूरबावडी पोलिसांनी दाम्पत्यासह तिघांविरुद्ध  गुन्हा दाखल केला.

fraud of bungalow construction work and lose one crore | बंगल्याला भुलले अन् एक कोटी गमावून बसले! नेमकं प्रकरण काय? वाचा...

बंगल्याला भुलले अन् एक कोटी गमावून बसले! नेमकं प्रकरण काय? वाचा...

Next

ठाणे :

बंगला बांधून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील पाच जणांची एक कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला. कापूरबावडी पोलिसांनी दाम्पत्यासह तिघांविरुद्ध  गुन्हा दाखल केला.

विलेपार्ले येथे राहणारे सुनील बांदेकर (६०) यांना नागाव येथे  घर बांधायचे होते. २०१८ मध्ये एका वृत्तपत्रात बंगला बांधून देणाऱ्या एका कंपनीची जाहिरात दिसली. त्यानुसार ठाण्यातील  कंपनीच्या ऑफिसमध्ये ते गेले. रॅंरो ट्रेडिंग कॉर्पोरेशन एलएलपी ही कंपनी त्यांच्या द कॉस्मो होम या ब्रॅण्डने बांधकाम व्यवसाय करीत असल्याचे त्यांना समजले. त्यांचे ऑफिस कापूरबावडी येथे असून, तिथे बांदेकर यांचा परिचय सुदिन शिंदे, त्यांची पत्नी जान्हवी आणि बहीण सायली शिंदे यांच्याशी झाला. आपण रॅंरो ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे भागीदार असल्याचे सांगितले. १४०० रुपये प्रती चौरस फूट दराने बांधकामाचे ठरल्यानंतर १५ जानेवारी २०१९ रोजी ५ लाखांचा धनादेश दिला; मात्र नंतर आरोपींनी प्लॅन दिला, ना बांधकाम केले, असा आरोप त्यांनी केला. 
 

Web Title: fraud of bungalow construction work and lose one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.