महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक
By धीरज परब | Updated: March 27, 2025 00:22 IST2025-03-27T00:22:02+5:302025-03-27T00:22:43+5:30
पैसे घेऊन कश्यप ह्याने कर्नाटका एक्झामिनेशन ऑथोरीटी लेटर व एस.एस. रमैया महाविद्यालय, बँगलोर यांचे बनावटी ऍडमिशन लेटर पाठवले.

महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक
मीरारोड- बंगळुरू येथील महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो सांगून १४ लाख ८९ हजार रुपये उकळून बनावट प्रवेश पत्र देऊन फसवणूक प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मीरारोड मध्ये राहणारे शगुफ्ता इरफान घारे यांचा मुलगा इकलाख ह्याला कर्नाटकच्या बंगळुरू येथील एम.एस. रमैया महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे आदित्य कश्यप ह्याने आश्वस्त केले होते. त्यासाठी त्याने घारे यांच्या कडून वेळोवेळी पैसे उकळले.
पैसे घेऊन कश्यप ह्याने कर्नाटका एक्झामिनेशन ऑथोरीटी लेटर व एस.एस. रमैया महाविद्यालय, बँगलोर यांचे बनावटी ऍडमिशन लेटर पाठवले. नंतर मात्र सदर लेटर हे बनावट असून कश्यप ह्याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर घारे यांनी पोलीस आयुक्त, उपायुक्त आदींना तक्रार केली होती.
त्या नंतर घारे यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी आदित्य कश्यप विरुद्ध १४ लाख ८९ हजार रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक समाधान केंगार हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.