भावाकडून बहिणीची फसवणूक, खोट्या व बनावट मृत्युपत्राचा केला वापर

By सदानंद नाईक | Published: April 14, 2023 07:14 PM2023-04-14T19:14:43+5:302023-04-14T19:15:01+5:30

या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Fraud of sister by brother, use of false and forged will | भावाकडून बहिणीची फसवणूक, खोट्या व बनावट मृत्युपत्राचा केला वापर

भावाकडून बहिणीची फसवणूक, खोट्या व बनावट मृत्युपत्राचा केला वापर

googlenewsNext

उल्हासनगर : जमिनीच्या सातबाराच्या उताऱ्यावरील बहिणीची नावे खोट्या व बनावट मृत्यूपत्राद्वारे हटवून, याबाबतचा जाब विचारणाऱ्या बहिणीला दम दिल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी तक्रार दिल्यावर भावाने बहिनीची फसवणूक केल्याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करवले गावात नंदा यशवंत पाटील राहतात. त्याच्या वडिलोपार्जित जमिनीवर यांच्यासह त्यांच्या बहिणीचे जमीन सातबारावर नावे आहेत. दरम्यान १० मे ते ९ नोव्हेंबर २०२२ साली उसाटने गावाच्या तलाठी कार्यालयात नरेश पद्माकर पाटील यांनी बहिणी नंदा पाटील, निर्मला पाटील व विठाबाई पाटील यांचे खोट्या व बनावट मृत्युपत्र बनवून न्यायालयातून त्यांची नावे सातबाराच्या उताऱ्यावरून कमी केली.

याबाबतची माहिती तिन्ही बहिणीला मिळाल्यावर, त्यांनी भाऊ नरेश पद्माकर पाटील यांना थेट जाब विचारला. यावेळी भावाने तिन्ही बहिणीला दम देऊन जमिनीवर आल्यास जिवेठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी बहिणीला धमकी दिल्याची तक्रार न्यायालयात केल्यावर मामा नरेश पद्माकर पाटील यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Fraud of sister by brother, use of false and forged will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.