सदनिका भाड्याने देऊन दोन कोटींची फसवणूक; मालकाला ठेवले अंधारात, चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 06:17 AM2024-06-25T06:17:41+5:302024-06-25T06:17:53+5:30
कळव्यातील खारिगाव भागात डॉ. धुरंदर कटके वास्तव्याला आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कळव्यातील खारिगाव भागातील टू बीचकेच्या दोन सदनिका परस्पर प्रत्येकी २५ लाखांच्या हेवी डिपॉझिटवर देऊन दोन कोटी ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. कळव्यातील खारिगाव भागात डॉ. धुरंदर कटके वास्तव्याला आहेत.
त्यांना ओळखीतून चेंबूरच्या गिरिजा पांडे आणि ब्रिजेस पांडे यांच्या इमारतीत दाेन फ्लॅट विक्रीसाठी असल्याचे समजले. त्यावेळी आपण बिल्डर असून फ्लॅट विक्रीसाठी असल्याचा दावा पांडे यांनी केला. कळव्यातील खारिगाव पाखाडी भागात गिरिजा पांडे, ब्रिजेश पांडे यांनी चेंबूर येथील टू बीएचके रूम तसेच अन्य एका रूमचे ॲग्रीमेंट फसवणूक केली.
आरोपींची दमदाटी
दोन्हीही फ्लॅटच्या लोनचे दर महिना डॉ. कटके हे हप्ते भरत आहे. दोन्ही फ्लॅटच्या चाव्या गिरिजा पांडे व ब्रिजेस पांडे यांच्याकडे विश्वासाने त्यांनी विक्रीसाठी दिल्या. तरीही त्यांनी दोन्ही रूम संदीप जठार, पंजाबी यांना प्रत्येकी २५ लाख रुपये हेवी डिपॉझिट घेऊन भाडेतत्त्वावर देत डॉ. कटके यांची फसवणूक केली. त्यांनी दोन्ही रूम खरेदी केलेल्या ठिकाणी डॉ. धुरंदर आणि त्यांचे भाऊ दीपक कटके यांना येण्यास मज्जाव करून दमदाटी केली. तसेच बघून घेण्याची धमकीही दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. कटके यांच्या तक्रारीनुसार गिरिजा, ब्रिजेश, संदीप आणि पंजाबी यांच्याविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.