गाडीप्रकरणी ११ हजार रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:32+5:302021-03-14T04:35:32+5:30

---------------- स्क्रू ड्रायव्हरने केले जखमी कल्याण : नवी मुंबईतील घणसोली येथे राहणारे अजित शर्मा हे लोढा हेवन येथे राहणाऱ्या ...

Fraud of Rs 11,000 in car case | गाडीप्रकरणी ११ हजार रुपयांची फसवणूक

गाडीप्रकरणी ११ हजार रुपयांची फसवणूक

googlenewsNext

----------------

स्क्रू ड्रायव्हरने केले जखमी

कल्याण : नवी मुंबईतील घणसोली येथे राहणारे अजित शर्मा हे लोढा हेवन येथे राहणाऱ्या रितेश गौरीशंकर शर्माच्या घरी नेहा शर्माचे लग्न ठरले आहे, असे सांगण्याकरिता गेला असता रितेशने अजित यांना स्क्रू ड्रायव्हरने जखमी केले. त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. तसेच अजित यांना मारहाणही केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------------

डोंबिवलीत बंगल्यात घरफोडी

कल्याण : डोंबिवली पूर्वेतील सीकेपी हॉलच्या जवळ असलेल्या अकल्पित बंगल्यात घरफोडी करून चोरट्यांनी रोकड व दागिने मिळून एकूण दोन लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी अमित मनसुखभाई लखानी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

----------------

क्षुल्लक कारणावरून मारहाण

कल्याण : बारावे गावातील किरण ढोणे हे त्यांच्या घराखाली बसले असता त्यांच्या लहान भावाने त्यांना खुन्नस देऊन दगड व रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात साईनाथ ढोणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, उलटपक्षी साईनाथ यालाही रॉडने किरण याने मारहाण केल्याची तक्रार साईनाथने दिली आहे. साईनाथच्या तक्रारीनुसार किरणच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

------------------

दुचाकीची चोरी

कल्याण : पूर्व भागातील तिसगाव परिसरात राहणारे तुषार सुतार यांनी त्यांची दुचाकी कल्याण रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ७ जवळ उभी करून ठेवली असता चोरट्यांनी दुचाकी चोरी केली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------

Web Title: Fraud of Rs 11,000 in car case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.