भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ठाण्यातील ठेकेदाराची १८ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 08:37 PM2021-02-12T20:37:58+5:302021-02-12T20:41:27+5:30

सोशल मिडियावर बनावट खाते तयार करुन तसेच नकली फार्मा कंपनी स्थापन करून भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ठाण्यातील एका ठेकेदाराला १८ लाख ५० हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या आठ जणांविरु द्ध ठेकेदाराने ११ फेब्रुवारी २०२१ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Fraud of Rs 18 lakh from Thane contractor under the pretext of doing business in partnership | भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ठाण्यातील ठेकेदाराची १८ लाखांची फसवणूक

फेसबुकवर उघडले बनावट खाते

googlenewsNext
ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हाफेसबुकवर उघडले बनावट खाते

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सोशल मिडियावर बनावट खाते तयार करुन तसेच नकली फार्मा कंपनी स्थापन करून भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ठाण्यातील एका ठेकेदाराला १८ लाख ५० हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रेस जॅक्सन आणि मनिष जैन सह आठ जणांविरु द्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्यातील सावरकरनगरमधील ४९ वर्षीय ठेकेदाराची फसवणूक करण्यासाठी आठ जणांनी मिळून हा कट रचला होता. या फसवणुकीसाठी ग्रेस जॅक्सन, डेव्हिड टॅम, रॉलीन्स ओवेन, अ‍ॅश्ले मायकल, आजय मिश्रा आणि मनिष जैन आदी आठ जणांनी फेसबुकवर बनावट खाते उघडले होते. तसेच स्पेशालिस्ट हेल्थ केअर फार्मा या नावाने बनावट कंपनी तयार करून गुगल साईटवर ती लोड केली. शिवाय वेगवेगळया बँकांमध्ये त्यांनी खातेही उघडले होते. त्यांनतर त्यांनी भागीदारीमध्ये उद्योग, व्यवसाय करण्याचे अमिष या ठेकेदाराला दाखविले. कोणतीही औषध निर्मितीची कंपनी नसतानाही ती असल्याचे भासवत त्यांनी या ठेकेदाराकडून तब्बल १८ लाख ५० हजार रु पये उकळले. त्यांनी हे पैसे त्याला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये भरण्यास सांगितले होते. फसवणुकीचा हा प्रकार २ फेब्रुवारी २०२० ते २७ फेब्रुवारी २०२० या काळात सुरु होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या आठ जणांविरु द्ध ठेकेदाराने ११ फेब्रुवारी २०२१ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Fraud of Rs 18 lakh from Thane contractor under the pretext of doing business in partnership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.