कंत्राट देण्याच्या नावाखाली ३२ लाखांची फसवणूक: आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 10:08 PM2020-12-16T22:08:31+5:302020-12-16T22:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील जगदीप दुबे यांची ३२ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील जगदीप दुबे यांची ३२ लाखांची फसवणूक करणाऱ्या रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा याच्या पोलीस कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
रोहित याने त्याचे साथीदार भगवान पवार, पल्लवी पवार, विठाबाई पवार आणि विनोद शेट्टी यांच्या मदतीने दुबे यांना अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे अमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून जानेवारी २०१६ ते ११ डिसेंबर २०२० या काळात त्याने ३२ लाख रु पये घेतले. त्यानंतर दुबे यांच्या नावाने उपहारगृहाचे कंत्राट मंजूर झाल्याचा बनावट कार्यादेश त्यांना दाखविला होता. प्रत्यक्षात कोणतेही कंत्राट न देता त्यांच्या पैशांचा अपहार करु न त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने त्याला १२ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. कासारवडवली पोलिसांनी अटक केल्यानंतर ठाणे न्यायालयाने त्याला १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कोठडीची मुदत बुधवारी संपल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. तेंव्हा ठाणे न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.