वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:04+5:302021-03-08T04:38:04+5:30

ठाणे : व्यवस्थापन कोट्यातून वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या सुधीर चव्हाण याला नौपाडा पोलिसांनी ...

Fraud of Rs 5 lakh in the name of gaining admission in medical branch | वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक

वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक

Next

ठाणे : व्यवस्थापन कोट्यातून वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या सुधीर चव्हाण याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाण्यातील बी केबिन नौपाडा भागात राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने यासंदर्भात २६ फेब्रुवारी २०२१ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. बारावी विज्ञान शाखेतून ७८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली ही विद्यार्थिनी वैद्यकीय नीट प्रवेशाची तयारी करीत आहे. मेडिकलच्या प्रवेशासाठी सरकारी महाविद्यालयात ९९ टक्के मेरिट लागल्यामुळे प्रवेश बंद झाले होते. एका ओळखीच्या व्यक्तीने या मुलीची मुंबईतील सुधीर चव्हाण यांच्याशी ओळख करून दिली होती. तेव्हा सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये व्यवस्थापनाच्या कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगून चव्हाण याने ३१ ऑगस्ट २०१९ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये या विद्यार्थिनीकडून पाच लाख २० हजारांची रक्कम वेगवेगळ्या दिवशी घेतली. त्यासाठी आपली मंत्रालयात मंत्र्यांकडे ओळख असल्याचेही भासविले होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सूरज जोंधळे, विनोद लभडे आणि पोलीस हवालदार गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने चव्हाण याला अलिबाग येथून ४ मार्च रोजी अटक केली. त्याने आणखी कोणाची अशाप्रकारे फसवणूक केली आहे का, याबाबत सखोल चौकशी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी राऊत यांचे पथक करीत आहे.

Web Title: Fraud of Rs 5 lakh in the name of gaining admission in medical branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.