इंटरनेट बँकिगद्वारे पावणेचार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:26+5:302021-09-09T04:48:26+5:30
मुंब्रा : इंटरनेट बँकिगच्या माध्यमातून बँकेच्या खात्यामधून तीन लाख ७४ हजार रुपये वळते करून फसवणूक केलेल्या मोबाइलधारकाविरोधात मुंब्रा ...
मुंब्रा : इंटरनेट बँकिगच्या माध्यमातून बँकेच्या खात्यामधून तीन लाख ७४ हजार रुपये वळते करून फसवणूक केलेल्या मोबाइलधारकाविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील प्रभादेवी येथे राहात असलेल्या महिलेने २७ ऑगस्टला गुगलवरून सर्च केलेल्या एका बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर फोन केला होता. तिने ज्या नंबरवर फोन केला होता. त्या नंबरवरून बोलत असलेल्या व्यक्तीने तिला बोलण्यात गुंतवून पैसे जलद वळते करण्यासाठी क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगून तिच्या वडिलांच्या बँकेचा खाते क्रमांक, युझर आयडी पासवर्ड ही माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार तिने तसे करताच तिच्या वडिलांच्या खात्यामधून तीन लाख ७४ हजार रुपये फोन करणाऱ्याने परस्पर वळते करून घेऊन फसवणूक केल्याची तक्रार महिलेने दाखल केली आहे. महिला पोलीस निरीक्षक माधुरी जाधव पुढील तपास करीत आहेत.