रेल्वेत स्टेशन मास्तरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडे सात लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 09:19 PM2021-07-27T21:19:13+5:302021-07-27T21:41:28+5:30
रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील एका ३० वर्षीय तरु णाची फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील एका महिलेसह सहा जणांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील एका ३० वर्षीय तरु णाची फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील एका महिलेसह सहा जणांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. आॅनलाईन बँकींगद्वारे या तरुणाला साडे सात लाखांना गंडा घातला आहे.
ठाण्यातील शिवाईनगर येथील या तक्रारदाराला यशवंत राऊत (कुलाबा, मुंबई), अभय रेडेकर उर्फ राणे (शिरोडा, जि. सिंधुदुर्ग), नरेंद्र प्रसाद (रा. उत्तरप्रदेश), रविंद्र शंकुवा रा. कल्याण, ठाणे), अर्जुन सिंग (रा. कलकत्ता) आणि रोशनी सिंग (रा. दिल्ली) या सहा जणांच्या टोळीने रेल्वेत स्टेशन मास्तर पदावर नोकरी लावून देण्याची बतावणी केली होती. आॅगस्ट २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात या टोळीने नोकरीसाठी पैसे भरावे लागतील, असेही या तरुणाला बजावले होते. आपल्याला नोकरी लागेल, या भाबडया आशेने या टोळीवर विश्वास ठेवत या तरु णाने सुमारे सात लाख ५० हजारांची रोख तसेच रोशनी सिंग यांच्या बँक खात्यात काही रक्कम आॅनलाइन बँकींगद्वारे वळते केले. त्यानंतर या टोळीने संबंधित तरुणाला बनावट नियुक्तीपत्र आणि ओळखपत्रही बनवून दिले. कहर म्हणजे नियुक्तीपत्र दिल्यानंतर त्याला कलकत्ता येथे प्रशिक्षणासाठीही पाठविण्यात आले. पण त्यानंतर हा सारा बनाव असल्याचा प्रकार या तरुणाच्या निदर्शनास आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर त्याने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात २६ जुलै २०२१ रोजी तक्र ार दाखल केली. सर्व आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक ए. बी. जाधव हे पुढील तपास करीत आहेत.