आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक
By admin | Published: August 1, 2015 11:42 PM2015-08-01T23:42:55+5:302015-08-01T23:42:55+5:30
गेल्या ५० ते ६० वर्षांपासून जमीन कब्जेवहिवाटीत असून त्यावर घरे, शेती, पीके, मंदिर अशी वहिवाट असताना मोजणी नकाशामध्ये ती न दाखविल्याने वाघेरापाडा, कांबा येथील आदिवासी
- संजय कांबळे, बिर्लागेट
गेल्या ५० ते ६० वर्षांपासून जमीन कब्जेवहिवाटीत असून त्यावर घरे, शेती, पीके, मंदिर अशी वहिवाट असताना मोजणी नकाशामध्ये ती न दाखविल्याने वाघेरापाडा, कांबा येथील आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. कल्याण येथील भूमी अभिलेख उपअधीक्षकाकडूनच ही फसवणूक झाल्याने याविरोधात आदिवासींनी जिल्हा अधीक्षकाकडे तक्र ार केली आहे.
कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीमधील हद्दीत वाघरेपाडा येथे १०० ते १५० आदिवासी वस्ती आहे. सर्व्हे नंबर ५२ मध्ये सुमारे ६० वर्षांपासून ते शेती करत आहेत. ही जमीन त्यांच्या कब्जेवहिवाटीत असून त्यावर घरे, पीक, बांधकाम, मंदिर आहे. तसा सातबारा व ३२ एम. त्यांच्या नावे आहेत.
शिवाय, आदिवासींची ७० ब ची केस कल्याण तहसीलदारांकडे सुरू आहे. या क्षेत्रात बांधलेल्या खोल्यांना कांबा ग्रामपंचायतीने घरपट्टीही लावली आहे. तसेच कांबा गावातील शेतकरी देवराम सुरोशे यांनी त्यांच्या कब्जेवहिवाटीत असलेल्या जागेत सिमेंट पोलचे कम्पाउंड टाकले. त्याला हायकोर्टाने परवानगी दिली. कल्याण मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व्हे नंबर ५२/२ या जागेत ५० ते ६० पोलचे कम्पाउंड असल्याचे पंचनाम्यात नमूद केले. याच ७/१२ मधील मिलिंद सूर्यकांत शहा याने ही जमीन मोजणीसाठी अर्ज केला. यावर पराडकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख, कल्याण यांनी सोयीस्कर कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे यांना अर्जदार करून आदिवासींच्या जमिनीची मोजणी केली. या वेळी सोयीस्करपणे मिलिंद शहा यांना नोटीस बजावण्यात आली. मात्र, एकाही आदिवासीला ती दिली नाही. तरीही, शेतकऱ्यांनी मोजणीच्या ४ दिवस आधी याला हरकती घेतल्या. परंतु, याचा विचार न करता पोलीस बळाचा वापर करून मोजणी उरकण्यात आली.
या पोलीस बळाविरोधात सर्व शेतकरी व आदिवासी एकत्र आल्यावर उपअधीक्षक पराडकर यांनी त्यांना सांगितले की, स.नं. ३५ मध्ये ज्याप्रमाणे इतरांचे हक्क, अधिकार, हितसंबंध होते तसे दाखले तसेच तुमच्या स.नं. ५२ मध्येही वस्ती, घरे, मंदिर, पिके, बांधकाम, शेती वहिवाट दाखवले जातील.
मोजणी केलेल्या सर्व्हेे नंबरच्या नकाशामध्ये आदिवासी व शेतकऱ्यांच्या वहिवाटी दाखविल्या आहेत.
- सुनील पराडकर (उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग, कल्याण )