कंपनीत नोकरीचे अमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 12:59 AM2021-04-10T00:59:18+5:302021-04-10T01:01:51+5:30
बँकेत तसेच मोठया कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुण तरुणींकडून पैसे उकळणाऱ्या ठाण्यातील एका प्लेसमेंट कंपनीचे पितळ उघडे पडले आहे, या कंपनीने शेकडो बेरोजाराना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकलल्या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बँकेत तसेच मोठया कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरु ण तरु णींकडून पैसे उकळणाऱ्या ठाण्यातील एका प्लेसमेंट कंपनीचे पितळ उघडे पडले आहे, या कंपनीने शेकडो बेरोजाराना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकलल्या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीच्या मालकांनी पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील दादा पाटील वाडी येथील किरण सोसायटी येथे एक खोली भाडयाने घेऊन या न्यू वर्क रिक्रूटमेंट या नावाने प्लेसमेंटची कंपनी सुरु झाली होती. सहा महिन्यांपूर्वीच सुरु झालेल्या या कंपनीने विविध सोशल मीडियाच्या वेबसाईटवर माहिती देऊन नोकरीच्या शोधात असणाºया बेरोजगारांना आपल्या जाळयात ओढायला सुरु वात केली होती. नोकरीच्या शोधातातील १९ वर्षीय तरुणीने एका जॉब साईटवर स्वत:ची माहिती आणि मोबाईल क्र मांक नोंदविला होता.
२५ मार्च २०२१ रोजी निशा जाधव यांना एका महिलेने फोन करून न्यू वर्क रिक्रूटमेंट या प्लेसमेंट येथून बोलत असल्याचे सांगून निशा यांना बायोडाटा घेऊन ठाण्यातील कार्यालयात बोलविले. बँकेत चार जागा भरायच्या असल्याचे सांगून तिथे पाठविण्यासाठी त्यांच्याकडून तीन हजार रु पये घेण्यात आले. त्यानंतर बँकेचा पत्ता फोनद्वारे देण्यात येईल, असे सांगण्यात आले. काही दिवस उलटूनही या रिक्रूटमेंटकडून काहीच फोन न आल्यामुळे निशा यांनी ठाण्याचे ते कार्यालय गाठले. तिथे अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचे त्यांना आढळले. त्यांच्याकडूनही त्यांनी पैसे उकळून अशीच बतावणी केली. ही कंपनी फसवी असल्याचे समजताच काही तरु णांनी स्थानिक समाजसेवक तुषार रसाळ यांच्या मदतीने नौपाडा पोलीस ठाण्यात ८ एप्रिल २०२१ रोजी तक्रार दाखल केली. २५ ते ३१ मार्च दरम्यान हा फसवणूकीचा प्रकार घडला असून अशा अनेकांची यामध्ये १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर या कंपनीच्या संचालकाने पोबारा केला आहे. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.