दागिन्यांवर व्याजाचे प्रलाेभन दाखवून फसवणारी टाेळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:53+5:302021-05-05T05:06:53+5:30
भिवंडी : साेन्याच्या दागिन्यांवर मासिक व्याज देण्याचे प्रलाेभन दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या टाेळीला शांतीनगर पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. आराेपींमध्ये एका ...
भिवंडी : साेन्याच्या दागिन्यांवर मासिक व्याज देण्याचे प्रलाेभन दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या टाेळीला शांतीनगर पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. आराेपींमध्ये एका महिलेसह सात जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ७३ लाख ५४ हजार ३२० रुपयांचे २४०६ ग्राम वजनाचे दागिने पाेलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती भिवंडी पाेलीस उपायुक्त याेगेश चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
रुबी मुस्तकीम अन्सारी असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी महिलेने शबनमबानो मोहमद कल्लन शेख यांच्याकडून अंदाजे साडेसहा तोळे सोन्याचे दागिने सहा महिन्यांसाठी घेतले हाेते. मात्र हे दागिने परत न देता त्यांचा अपहार केला. त्यामुळे फसवणूक झालेल्या शबनमबानाे यांनी २९ मार्च २०२१ शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावरून गुन्हा दाखल झाला हाेता. रुबी हिने इतर महिलांचे दागिने घेऊन व्याज देण्याचे प्रलाेभन दाखवून फसवणूक केली होती. एक तोळे सोन्यावर १५०० रुपये, तर एक लाख रुपयावर दहा हजार रुपये मासिक व्याज देण्याचे रुबी हिने महिलांना सांगितले होते. रुबी हिने साथीदारांच्या मदतीने सुमारे २६५ लोकांची फसवणूक केल्याचे तपसात निष्पन्न झाले. त्यानंतर शांतीनगर पोलिसांनी रुबीसह सात साथीदारांना पोलिसांनी अटक केली. आराेपींनी मन्नपुरम गोल्ड लोन भिवंडी येथे ठेवलेले १५२५.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, मुथूट फायनान्स माजीवाडा येथील ९८.४ ग्रॅम वजनाचे दागिने, अटक केलेल्या सोनाराकडून ४९३ ग्रॅम दागिने व एका आराेपीकडून २८९.८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असल्याची माहिती पोलीस उपयुक्त योगेश चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी दिली आहे.
या गुन्ह्याच्या तपासात शांतीनगर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नितीन सूर्यवंशी, सहायक पाेलीस निरीक्षक मुक्ता फडतरे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश जाधव, रवींद्र पाटील व तपास पथकातील अमलदारांनी माेलाची कामगिरी बजावली.