उल्हासनगर महापालिकेच्या वतीने मोफत ब्रेस्ट कर्करोग तपासणी शिबीर
By सदानंद नाईक | Published: May 10, 2023 07:38 PM2023-05-10T19:38:08+5:302023-05-10T19:38:50+5:30
४० वर्षांच्या पुढील महिला मोफत ब्रेस्ट कर्करोग तपासणी शिबीराचा लाभ घेऊ शकतात. अशी माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली आहे.
उल्हासनगर: महापालिका आरोग्य विभागाने महिलांसाठी मोफत ब्रेस्ट तपासणी शिबिराचे आयोजन केले. शिबिराचे उद्घाटन आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते झाले असून महिलांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
उल्हासनगर महापालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. शहरातील दारीद्रय रेषेखालील, आर्थिक दृष्टया दुर्बल, दिव्यांग, विधवा तसेच गरीब व गरजु महिलांची स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) तपासणी शिबिर सोमवारी महापालिका मुख्यालय प्रांगणात आयोजित केले होते. त्यानंतर प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान राहणार आहे. ४० वर्षांच्या पुढील महिला मोफत ब्रेस्ट कर्करोग तपासणी शिबीराचा लाभ घेऊ शकतात. अशी माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली आहे.
शहरातील सर्व महिलांनी या शिबीराचा लाभ घेऊन सहभाग नोंदवावा. असे आवाहन पालिका आयुक्त अजीज शेख यांनी उद्घाटन प्रसंगी केले. शिबीरास महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त् करुणा जुईकर, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, महापालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे व महिला व बालकल्याण विभाग प्रमुख नितेश रंगारी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.