उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाकडून मोफत कर्करोग आरोग्य शिबिर
By सदानंद नाईक | Published: April 10, 2023 03:41 PM2023-04-10T15:41:03+5:302023-04-10T15:42:28+5:30
शिबिराचा १५० पेक्षा जास्त जणांनी लाभ घेतल्याची माहिती शिबिराचे आयोजक व उपशहरप्रमुख शेखर यादव यांनी दिली.
सदानंद नाईक, उल्हासनगर : शिवसेना ठाकरे गटाकडून मराठा सेक्शन येथील मध्यवर्ती कार्यालय शेजारील उल्हास विद्यालयात कर्करोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी आयोजित केले होते. शिबिराचा १५० पेक्षा जास्त जणांनी लाभ घेतल्याची माहिती शिबिराचे आयोजक व उपशहरप्रमुख शेखर यादव यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-४, मराठा सेक्शन येथील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखा व माजी नगरसेवक तथा उपशहरप्रमुख शेखर यादव यांच्या संकल्पनेतून उल्हास विद्यालयात तपासणी आणि महिलांसाठी गर्भाशय ग्रीवेचे कर्करोग(पैप स्मीयर टेस्ट) पडताळणी व निदान शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले. यावेळी कर्करोगतज्ञ डॉ.प्रितम कळसकर यांनी २५ वर्षावरील महिलांच्या तपासण्या केल्या. तब्बल १५० पेक्षा जास्त महिलांनी शिबिराचा लाभ घेतला आहे.
कर्करोग निदान शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक व उपशहरप्रमुख शेखर यादव, राकेश कांबळी, मनेष यादव, प्रनंजय वायंगणकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समनव्यक धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख राजू माने, बापू सावंत, विजय सावंत, विभागप्रमुख प्रकाश माळी, विजू सोनार, महिला आघाडीच्या सुनिता गव्हाणे, प्रतिभा कालेकर, सुषमा साळवी, कल्पना यादव आदी जण उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"