संगीतावाडी, राजाजी पथ येथे ५०० नागरिकांचे मोफत लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:39 AM2021-04-06T04:39:25+5:302021-04-06T04:39:25+5:30
डोंबिवली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने व्हावे, यासाठी माजी नगरसेवक राजेश मोरे, मुकुंद पेडणेकर यांनी त्यांच्या प्रभागात विनामूल्य लसीकरण ...
डोंबिवली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने व्हावे, यासाठी माजी नगरसेवक राजेश मोरे, मुकुंद पेडणेकर यांनी त्यांच्या प्रभागात विनामूल्य लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सोमवारी दिवसभरात ५०० हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
पेडणेकर, मोरे याबाबत म्हणाले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतल्यावर प्रभागांत लसीकरणाला वेग आला. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. राजाजी पथ येथील आदर्श शाळेत सकाळपासून लसीकरण सुरू झाले. तेथे १५५ नागरिकांना लस देण्यात आली, तर शिवमंदिर रोडवरील हिंदी शाळेच्या पटांगणात २५५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर कोणालाही त्रास झाला नाही. आज, मंगळवारी ४००, तर उद्या, बुधवारी ५०० जणांना लस दिली जाणार आहे.
दरम्यान, पश्चिमेतही मोठागाव ठाकुर्ली येथेही मोफत लसीकरण केले जात असल्याचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
-------------------
फोटो आहे
-----------------