गणेश विद्यालयात मुलांचे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:01 AM2019-11-26T11:01:16+5:302019-11-26T11:01:49+5:30

गणेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राथमिक व माध्यमिक शाळेची मुले, शिक्षक व कर्मचारी मिळून ८५० जणांची मोफत नेत्र तपासणी यावेळी करण्यात आली.

Free ophthalmic examination of children at Ganesh Vidyalaya | गणेश विद्यालयात मुलांचे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

गणेश विद्यालयात मुलांचे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

googlenewsNext

टिटवाळा: इनर व्हिल क्लब ऑफ कल्याण व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, टिटवाळा (पूर्व) मधील मुलांकरीता मोफत नेत्र तपासणी शिबिराचे शनिवार आयोजन करण्यात आले होते. 

शिबिराचे उद्घाटन गणेश पूजन व दीप प्रज्वलन इनर व्हिल क्लब ऑफ कल्याणच्या पल्लवी जोशी, श्रीमती अर्चना सबनीस, आशा अनारकट, शाहीन हुसेन, गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रोटेरीयन सुभाष जोशी व वसंत  केणे सर, गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक पुराणिक  व रेड स्वस्तिक सोसायटीचे प्रमोद नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गणेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राथमिक व माध्यमिक शाळेची मुले, शिक्षक व कर्मचारी मिळून ८५० जणांची मोफत नेत्र तपासणी यावेळी करण्यात आली. या प्राथमिक तपासणी शिबीरा मधून १०७ मुलांना पुढील तपासणीसाठी ईशा नेत्रालयात पाठविण्यात येणार आहेत. शिबीर यशस्वी करण्यासाठी ईशा नेत्रालय व गंधर्व गुरुकुलचे सहकार्य लाभले, तर गणेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राथमिक व माध्यमिकचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Free ophthalmic examination of children at Ganesh Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.