रेल्वे स्थानकात करा फ्री पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 05:42 AM2017-09-16T05:42:55+5:302017-09-16T05:43:13+5:30
ठाणे रेल्वे स्थानकातील तळ मजल्यावर सुरू झालेली पार्र्किं ग सुविधा गुरुवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी येथे मोटारसायकल पार्क करणा-यांची गैरसोय होऊ नये, तसेच कोणीही विनाकारण पैसे घेऊ नये, यासाठी तेथे सध्या फ्री पार्र्किं ग सुरू केली आहे.
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील तळ मजल्यावर सुरू झालेली पार्र्किं ग सुविधा गुरुवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी येथे मोटारसायकल पार्क करणा-यांची गैरसोय होऊ नये, तसेच कोणीही विनाकारण पैसे घेऊ नये, यासाठी तेथे सध्या फ्री पार्र्किं ग सुरू केली आहे. वाहन पार्क करा, पण आपल्या जबाबदारीवर, असे खडूने नोंदवण्यात आले आहे.
वाढत्या वाहनांमुळे होणारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे, कोपरी पूर्वेकडील पार्र्किं गच्या कोटेशन्स पद्धतीने अर्धवट इमारतीच्या तळ मजल्यावर पार्र्किं गची व्यवस्था जून महिन्यात सुरू केली. तीन महिन्यांसाठी कोटेशन्स पद्धतीने वाहन पार्किंगचा ठेका दिला होता. तो गुरुवारी मध्यरात्री संपला. मात्र, अद्यापही दुसरा ठेकेदार न मिळाल्याने गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच कोणी या संधीचा फायदा घेऊन दादागिरी करून तेथे विनाकारण पैसे उकळण्याची भीती लक्षात घेऊन ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाने येथे असा बोर्ड लावला आहे.
पैसे घेणा-यांवर कारवाई
वाहन पार्किंगच्या नावाखाली कोणी पैसे घेऊ नये, यासाठी सध्या पार्र्किं ग फ्री केले आहे. तसेच पार्र्किं ग करण्यासाठी पैसे घेत असल्यास नागरिकांनी रेल्वे प्रबंधक कार्यालयात तक्रार करावी. पैसे घेणाºया व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करता येईल. असे ठाणे रेल्वे प्रबंधक एस.बी. महीदर यांनी सांगितले.