ठाण्यातील मॉलमध्ये पार्किंग मोफत करा,भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 01:17 AM2019-06-29T01:17:43+5:302019-06-29T01:18:02+5:30

पुणे आणि नाशिक महापालिकांनी शहर विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी केल्याने शहरातील मॉल व मल्टिप्लेक्समध्ये नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा मिळाली आहे. त्या

Free parking in Thane Mall, BJP's demand | ठाण्यातील मॉलमध्ये पार्किंग मोफत करा,भाजपची मागणी

ठाण्यातील मॉलमध्ये पार्किंग मोफत करा,भाजपची मागणी

Next

ठाणे : पुणे आणि नाशिक महापालिकांनी शहर विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी केल्याने शहरातील मॉल व मल्टिप्लेक्समध्ये नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा मिळाली आहे. त्याच धर्तीवर ठाणे शहरातील मॉल व मल्टिप्लेक्समध्ये मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे आणि दिवा भाजपचे सरचिटणीस रोहिदास मुंढे यांनी निवेदनाद्वारे महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.

शहर विकास नियंत्रण नियमावलीनुसार व्यावसायिक इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था करून मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे संबंधित व्यावसायिकांना बंधनकारक आहे. मात्र, या नियमाला हरताळ फासून ठाणे शहरातील मॉल्स-मल्टिप्लेक्समध्ये नागरिकांना चारचाकी वाहने व दुचाकींसाठी स्वतंत्र पार्किंग शुल्क आकारले जात आहे. याउलट, पुणे शहरात पार्किंग प्रश्न बिकट झाल्यावर आठ दिवसांपूर्वी नागरिकांसाठी सर्व मॉल्समध्ये मोफत पार्किंग उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने ठराव मंजूर करून महापालिकेच्या विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या ठरावाच्या अंमलबजावणीबाबत मॉल व्यवस्थापनाने टाळाटाळ करताच महापालिकेने या मॉल मल्टिप्लेक्सला नोटिसा बजावल्या होत्या.

या नोटिसांनंतर शहरातील मॉलमध्ये मोफत पार्किंगची अंमलबजावणी सुरू झाली. पुण्यानंतर नाशिक महापालिकेनेदेखील ठराव करून मॉलमध्ये मोफत पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पुणे व नाशिकप्रमाणेच ठाणे शहरातील पार्किंगचा प्रश्नसुद्धा जटिल झाला आहे.

मुख्य शहराबरोबरच मॉलच्या परिसरात उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असून या वाहतूककोंडीमुळे नागरिकांचा नाहक वेळ वाया जात आहे. म्हणूनच, ठाणे शहरातदेखील मॉल व मल्टिप्लेक्समध्ये मोफत पार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

Web Title: Free parking in Thane Mall, BJP's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.