कळवा खाडीच्या तिसऱ्या पुलाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:41 AM2019-01-25T00:41:33+5:302019-01-25T00:41:39+5:30

ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणा-या तिस-या पुलाचे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.

Free the path of third bridge of Kalwa Creek | कळवा खाडीच्या तिसऱ्या पुलाचा मार्ग मोकळा

कळवा खाडीच्या तिसऱ्या पुलाचा मार्ग मोकळा

googlenewsNext

ठाणे : ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणा-या तिस-या पुलाचे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. परंतु हा खाडीपूल एका बाजूने साकेतच्या दिशेने खाली उतरणार असल्याने त्या ठिकाणी कांदळवनाचे क्षेत्र बाधित होणार होते. त्यामुळे ते पालिकेकडे वळते करण्यासंदर्भात ठाणे महापालिकेकडे राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार राज्य शासनाने येथील ०.२७४ हेक्टर कांदळवनक्षेत्र हे वळते करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या खाडीपुलाच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.
मुंबईच्या सी लिंकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनेदेखील विटावा पुलाखालील आणि एकूणच या भागातील वाहतूककोंडी सुटावी यासाठी कळवा खाडी पुलावर तिसºया नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये पुढे आणला होता. सध्या येथील कळवा खाडीवर एक ब्रिटिशकालीन आणि आणि एक नवा पूल आहे; परंतु ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्याने त्या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे दुसºया पुलावर वाहतुकीचा वेग मंदावला असून तोही वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसºया पुलाचा पर्याय पुढे आणला. आता कांदळवनाचा प्रश्न सुटल्याने हे कामही मार्गी लागणार आहे.
>असा आहे तिसरा पूल
महापालिकेने २०११ च्या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. आता त्यावर १८३ कोटींचा खर्च केला जात आहे. जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर तो उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वनवे पूल असणार आहे. तर विटाव्याकडून येणाºया वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय ठेवला आहे.
या तिसºया पुलामुळे येथील वाहतूककोंंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनीषानगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे-बेलापूर दिशेला असा दोनही मार्गाने तो खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येताना तो साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. तसेच आता यात थोडा बदल केला असून आत्माराम चौकापर्यंतचा रस्ता त्याला जोडण्यात येणार आहे. केबल स्टेड टाइपचा हा पूल असणार असून तो दीड किमीचा असणार आहे. यामुळे विटाव्या पुलाखालील आणि कळवानाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फुटणार असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे.
>डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचा दावा
येत्या डिसेंबर अखेर या पुलाचे काम पूर्ण होईल, असा दावा आता पालिकेने केला होता; परंतु यामध्ये खाडीतील बाधित होणारे कांदळवन हा प्रमुख अडथळा ठरत होता. त्यामुळे येथील ०.२७४ हेक्टर कांदळवनक्षेत्र वळते करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार गुरुवारी राज्य शासनाच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) यांनी वनविभागाकडील हे क्षेत्र वळते करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खाडीतही पालिकेला पुलाचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कदाचित डिसेंबरअखेर तो वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, असा दावा पालिकेने पुन्हा एकदा केला आहे.

Web Title: Free the path of third bridge of Kalwa Creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.