डोंबिवलीत भरणार फुलपाखरांच्या छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन : ८००हून अधिक विविध जाती-प्रजातींच्या फुलपाखर, पतंग, किटकांच्या छायाचित्रांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:24 AM2017-11-22T11:24:12+5:302017-11-22T11:30:20+5:30
फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन डोंबिवलीमध्ये २५ ते २६ नोव्हेंबर असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात येणार असून ते प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.
डोंबिवली: फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत फुलपाखरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन डोंबिवलीमध्ये २५ ते २६ नोव्हेंबर असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात येणार असून ते प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असल्याचे आयोजक, आणि छायाचित्रकार डॉ. राजेश महाजन यांनी सांगितले.
त्यासंदर्भात त्यांनी बुधवारी डोंबिवलीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. महाराष्ट्रातील कोकणात चिपळुण, रत्नागिरी, महड, जळगाव, डोंबिबली, नासिक, पुणे, लोणावळा, खंडाळा, ठाणे आदी भागांमध्ये प्रवास, भ्रमंतीमधून गेल्या आठ वर्षामध्ये त्यांनी १५०० हून अधिक छायाचित्र काढली, त्यांचे संकलन केले. प्रदर्शनामध्ये सुमारे ८००हून अधिक विविध जाती-प्रजातींच्या फुलपाखर, पतंग, किटकांच्या छायाचित्रांचा समावेश असल्याचे ते सांगतात. त्या सगळयांचे फोटो आणि खाली तपशीलात माहिती देण्यात येणार आहे. त्यामध्ये २०० विविध रंगांची फुलपाखरे, ८०० प्रकारचे चतुर-पतंग, यासह ५०० प्रकारचे किटक अशांचे छायाचित्र काढुन संकलीत करण्यात आले.
दोन दिवस चालणा-या प्रदर्शनाचा शाुभारंभ उत्तर महाराष्ट्राचे माजी कुलगुरु डॉ. आर.एस.माळी, कल्याण बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. शिरिष देशपांडे, इन्डो अमाईनचे संचालक विजय पालकर आदी मान्यवर करणार असल्याची माहिती डॉ. राजेश महाजन यांनी दिली. आठ वर्षांमध्ये प्रथमच प्रथमच हे छायाचित्र प्रदर्शन डोंबिवलीत भरवण्यात येत असल्याने भ्रमंतीप्रिय, कलारसिक डोंबिवलीकरांनी ते बघण्यासाठी आवर्जून यावे असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. असणार आहे. एमआयडीसी भागातील इंडो अमाईन्सच्या या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.