मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक  पिशव्यांची मुक्तपणे विक्री; शासन बंदीला पालिकेचा हरताळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 03:15 PM2020-06-04T15:15:54+5:302020-06-04T15:16:04+5:30

इतक्या मोठ्या संख्येने प्लास्टिक चा साठा व त्याची घाऊक विक्री तसेच दैनंदिन वापर बिनबोभाट सुरु असताना महापालिका प्रशासन सर्रास डोळेझाक करत आहे

Free sale of banned plastic bags in Mira Bhayandar; Municipal strike to ban government | मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक  पिशव्यांची मुक्तपणे विक्री; शासन बंदीला पालिकेचा हरताळ 

मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक  पिशव्यांची मुक्तपणे विक्री; शासन बंदीला पालिकेचा हरताळ 

googlenewsNext

मीरारोड - कायद्याने बंदी असूनही पर्यावरण व आरोग्याला घातक असलेल्या  प्लास्टिक पिशव्यांचा कोरोनाच्या काळात मात्र  सर्रास वापर व विक्री सुरु असताना मीरा भाईंदर महापालिकेने या गंभीर बाबी कडे काणाडोळा चालवला आहे .  त्यामुळे शहरात  प्लास्टिक बंदीला हरताळ फसला जाऊन बंदी असलेल्या  प्लास्टिक पिशव्यांचा बिनबोभाट सुळसुळाट झाला आहे . 

प्लास्टिक पिशव्या , प्लास्टिक कंटेनर, चमचे , प्लेट , ग्लास , थर्माकॉल आदी वस्तूंवर राज्य शासनाने बंदी घातलेली आहे . इतकेच नव्हे तर पंतप्रधान , राज्यपाल आदींनी देखील एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आदी वस्तूंचा वापर बंद करण्याचे आवाहन केले होते . . 

प्लास्टिक  पिशव्या खाडी , नदी , समुद्र, तलाव , नाल्यात  मोठ्या संख्येने जमा होत असल्याने जलप्रदूषण होत आहे. प्लास्टिक  मुळे पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद होऊन पावसात पूरस्थिती निर्माण होण्यामागे देखील एक कारण ठरत आहे .  मच्छीमारांना सुद्धा जाळ्यात प्लास्टिक , कचरा अडकून त्यांच्या उपजिविकेवर संक्रांत आली आहे . 

भटके कुत्रे, गाई - गुरं यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांच्या प्रकृतीला बाधा होऊन मृत्यू होतात.  प्लास्टिक पिशव्या - कंटेनर मधून अन्न पदार्थ घेणे मानवी आरोग्याला घातक ठरत आहे .  पर्यावरणाला सुद्धा मोठे नुकसान होत असताना कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्या पासून तर महापालिकेने प्लास्टिक पिशव्या आदींना मोकळीकच दिली आहे . 

शहरात सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक  पिशव्यांचा वापर अन्न पदार्थ , भाजी , फळ , किराणा , बेकरी, अंडी , मासे - मटण आदी देण्या करिता केला जात आहे . महत्वाचे घरपोच वस्तूचा व्यवसाय करणाऱ्यांकडूनमदतकार्य करणाऱ्यांकडून तर उघडपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु आहे . इतकंच नव्हे तर काही प्रकरणात प्रशासन व लोकप्रतिनिधी कडून देखील बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला गेलाय . 

इतक्या मोठ्या संख्येने प्लास्टिक चा साठा व त्याची घाऊक विक्री तसेच दैनंदिन वापर बिनबोभाट सुरु असताना महापालिका प्रशासन सर्रास डोळेझाक करत आहे . तर नगरसेवक , राजकारणी तर नेहमीच या प्लास्टिक वापरावर मूग गिळून बसले आहेत . त्यामुळे यात मोठे अर्थकारण व अनेकांना आर्थिक फायदा पोहचवण्यासाठी प्लास्टिक बंदीला हरताळ फासला जात असल्याचा आरोप जागरूक नागरिकां मधून होत आहे .  या बाबत ठोस कारवाईची मागणी त्यांनी केली आहे . 

Web Title: Free sale of banned plastic bags in Mira Bhayandar; Municipal strike to ban government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.