आज सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यातील आरटीईच्या ६३७१ बालकांचे माेफत शालेय प्रवेश
By सुरेश लोखंडे | Published: May 8, 2023 07:19 PM2023-05-08T19:19:10+5:302023-05-08T19:19:20+5:30
१५ मेपर्यंत प्रवेशासाठी मुदत वाढ
ठाणे: वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ १ ली ते ८ वी पर्यतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी शिक्षणाचा हक्क (आरटीई) अंतर्गत २५ टक्के मोफत शालये प्रवेश राखीव ठेवले आहेत. त्याव्दारे आजच्या शेवटच्या िदवसापर्यंत सहा हजार ३७१ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. उर्वरीत िवद्याथ्यार्ंना या शालेय प्रवेशाचा लाभ मिळवून देण्यासाठी १५ मेपर्यंत या शालेय प्रवेशाची मुदत वाढ देण्यात आली आहे.
या माेफत शालेय प्रवेशासाठी जिल्ह्यात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्ष्k साठी शालेय प्रवेश निश्चित करण्यात येत आहेत. यासाठी ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात आर.टी.ईच्या या प्रवेशासाठी लॉटरी ची प्रक्रीया राज्यस्तरावरून पुर्ण करण्यात आलेली आहे.यात ठाणे जिल्ह्यातील १० हजार ९९६ अर्जाची निवड झाली आहे. त्यापैकी साेमवार या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ सहा ३७१ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. निवड झालेल्या उर्वरीत बालकांच्या प्रवेशासाठी १५मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बालकांच्या या शालेय प्रवेशासाठी पालकांनी ऍडमिट कार्ड, हमी पत्राची ची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जायचे आहे. तेथील पडताळणी समितीकडून विहित कालावधीत आपल्या पाल्याचा शालेय प्रवेश दिलेल्या मुदतीत निश्चित करून घेण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणविभागाकडून करण्यात आले आहे.
या प्रवेशास पात्र असलेल्या बालकांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त हाेईल. परंतु फक्त या एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची खात्री पालकांनी करून घ्यावी. या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जाणार आहे.