ठाणे जिल्ह्यातील खेडेगावातील ७३ बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेसह ४२६ बालकांच्या अन्य आजाराच्या मोफत शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:36 PM2018-04-03T19:36:28+5:302018-04-03T19:36:28+5:30

विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता ८२ बालकांना हृदय विकाराच्या आॅप्रेशनाची गरज असल्याचे उघड झाले. त्यातील ७३ बालकांचे तत्काळ आॅपरेशन झाले तर ९ जणांची बाकी आहेत. तर अन्यआजारांच्याा ४८४ बालकांपैकी ४२६ बालकांची शस्क्रीय झाले आहेत. उर्वरित १४७ बालकांच्या शस्त्रक्रिया लवकरच होणार

Free surgery for other 426 children with heart surgery of 73 children of village Khedgaon in Thane | ठाणे जिल्ह्यातील खेडेगावातील ७३ बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेसह ४२६ बालकांच्या अन्य आजाराच्या मोफत शस्त्रक्रिया

ठाणे जिल्ह्यातील खेडेगावातील ७३ बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेसह ४२६ बालकांच्या अन्य आजाराच्या मोफत शस्त्रक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देशाळेत शिकणाऱ्या १८ वर्षापर्यंतच्या सुमारे ७३ जणांच्या मोफत शस्त्रक्रियाअन्य आजारांविषयीच्या ४२६ बालकांच्या शस्त्रक्रियाएक लाख १५ हजार १०५ अंगणवाडीतील बालकांपैकी एक लाख १७ हजार ५६२ बालकांची तपासणी

ठाणे  : शासनाच्या विविध योजनेव्दारे गावे, पाडे आदींमधील शाळेत शिकणाऱ्या १८ वर्षापर्यंतच्या सुमारे ७३ जणांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर अन्य आजारांविषयीच्या ४२६ बालकांच्या शस्त्रक्रिया ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंणात मुंबईच्या ठिकठिकाणी रूग्णालत करण्यात आल्याचा दावा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत करण्यात आला.
गावखेड्यातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता ८२ बालकांना हृदय विकाराच्या आॅप्रेशनाची गरज असल्याचे उघड झाले. त्यातील ७३ बालकांचे तत्काळ आॅपरेशन झाले तर ९ जणांची बाकी आहेत. तर अन्यआजारांच्याा ४८४ बालकांपैकी ४२६ बालकांची शस्क्रीय झाले आहेत. उर्वरित १४७ बालकांच्या शस्त्रक्रिया लवकरच होणार असल्याचे सुतोवाच डॉ. सोनावणे यांनी केले. मुंबईतील केएम, टाटा, ज्युपीटर आणि जेजे आदी रूग्णालयांच्या तज्ज्ञाकडून करण्यात आले.
आरोग्य विभागाव्दारे जिल्ह्यातील शाळांमधी सुमारे दोन लाख ३६ हजार ६५० बालकांची आरोग्य तपासणीचा दावा देखील जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी केला आहे. तर मनपा क्षेत्रात एक लाख ४८ हजार २७२ विद्यार्थ्यांपैकी एक लाख १७ हजार ५६२ मुलांच्या आरोग्य तपासण्या झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर एक लाख १५ हजार १०५ अंगणवाडीतील बालकांपैकी एक लाख १७ हजार ५६२ बालकांची तपासणी झाली. जिल्ह्यात सुमारे एक हजार ७०४अंगणवाड्या कार्यरत आहेत. तर शहरांमध्ये एक हजार ६२९ अंगणवाडी केंद्र सुरू आहेत. त्या

Web Title: Free surgery for other 426 children with heart surgery of 73 children of village Khedgaon in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.