प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:45 AM2021-09-21T04:45:12+5:302021-09-21T04:45:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथे तीन व्यवसायांमध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथे तीन व्यवसायांमध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये मोबाइल फोन हार्डवेअर रिपेरिंग टेक्निशियन, फिल्ड टेक्निशियन (एसी) आणि फक्त महिला व मुलींसाठी ब्युटी थेरपिस्ट यासारख्या कौशल्ययुक्त आणि रोजगार मिळवून देणाऱ्या कमी कालावधीच्या कोर्ससाठी प्रवेश सुरू आहेत. प्रत्येक व्यवसायासाठी फक्त ३० जागा आहेत. यापैकी आतापर्यंत ४० जागा भरल्या आहेत, एकूण ५० जागा शिल्लक आहेत.
हा कोर्स औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबरनाथ येथे प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असून कोर्स हे विनामूल्य असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य अजित शिंदे यांनी केले आहे. हा कोर्स झाल्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग (DGT) नवी दिल्ली यांच्यामार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात येऊन त्यामध्ये पास झाल्यानंतर प्रशस्तिपत्रक ही प्रदान करण्यात येईल. हे प्रशस्तिपत्रक भारतात कुठेही उपयोगी अथवा वापरता येईल. सध्या जे तीन व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत, ते अनुक्रमे ४०० तास, ३०० तास आणि ३९० तास असे आहेत. यापैकी मोबाइल फोन हार्डवेअर रिपेरिंग या कोर्ससाठी कमीत कमी आयटीआय पास असणे गरजेचे आहे आणि ब्युटी थेरपिस्ट या व्यवसायाला दहावी पास असणे गरजेचे आहे. तसेच फिल्ड टेक्निशियन (एसी) या व्यवसायाला इयत्ता आठवी पासपासून पुढे कोणीही प्रवेश घेऊ शकतो.