चार खासगी रुग्णालयांत गरीब रुग्णांवर मोफत उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:49 PM2020-05-20T23:49:27+5:302020-05-20T23:50:34+5:30
याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता. पिवळे, केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे
ठाणे : ठाणे शहरामधील होरायझन प्राइम, सफायर, कौशल्या आणि वेदांत हॉस्पिटलमध्ये कोविड १९ बाधित गरीब गरजू नागरिकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता.
पिवळे, केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे या योजनेंतर्गत उच्च प्रतीचे उपचार, अत्याधुनिक सुविधा व पौष्टिक जेवण सर्व रुग्णांना विनामूल्य देण्यात येणार आहे.
दरम्यान, ठाणे जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी १५० खाटा वाढवणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. बुधवारी या रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. सध्या येथे २५० खाटा असून त्यांची संख्या ४०० होणार असून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.