ठाण्यात महापौर नरेश म्हस्के यांच्या वतीने ५०० नागरिकांचे मोफत लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 01:29 AM2021-09-06T01:29:18+5:302021-09-06T01:32:41+5:30
कोपरी वाघजाई मंदिरासमोर आयोजिलेल्या या लसीकरण शिबिरांतर्गत ५०० नागरिकांना ७८० रूपयांची कोविशिल्ड लस महापौर म्हस्के यांच्या वतीने मोफत देण्यात आली. ठाणे शहरात आजपर्यंत दहा लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ठाणे महापालिकेने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र जरी सुरु असली तरी सध्या लसींचा पुरवठा हा कमी होत आहे. नागरिकांचे १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या वतीने मेयर आॅरगॅनिक आणि ज्युपिटर रूग्णालय यांच्या सहकार्याने आनंदनगर येथील नागरिकांसाठी रविवारी एक दिवसाचे खासगी मोफत लसीकरण शिबीर आयोजित केले होते.
_कोपरी वाघजाई मंदिरासमोर आयोजिलेल्या या लसीकरण शिबिरांतर्गत ५०० नागरिकांना ७८० रूपयांची कोविशिल्ड लस महापौर म्हस्के यांच्या वतीने मोफत देण्यात आली. ठाणे शहरात आजपर्यंत दहा लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ठाणे महापालिकेने केले आहे. कोपरी आनंदनगर येथेही महापालिकेचे नियमित लसीकरण केंद्र सुरू आहे. परंतू लसींचा पुरवठा हा कमी प्रमाणात होत असल्यामुळे अनेक नागरिकांना लस मिळालेली नाही. यासाठी महापौर म्हस्के यांनी मेयर आॅरगॅनिक आणि ज्युपिटर रुग्णालयाच्या वतीने कोपरी आनंदनगर_ येथील नागरिकांना ७८० रूपयांची कोविशिल्ड लस मोफत दिल्याचे महापौरांनी सांगितले. या लसीकरण शिबिराचा ५०० नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवसेना उपविभाग प्रमुख रमण बटवले, शाखाप्रमुख महादेव पवार, विजय पाटील, उपशाखा प्रमुख सतीश हिंगे आणि शशिकांत माळी आदींनी परिश्रम घेतले._
कोरोना जरी आटोक्यात असला तरी तो पूर्ण संपलेला नाही. त्यामुळे लस घेतली तरी मास्क लावणे गरजेचे असल्याचा सल्ला महापौर म्हस्के यांनी दिला आहे. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नागरिकांनी हा उत्सव नियमांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.