फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाइन ५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:11+5:302021-08-13T04:46:11+5:30
उल्हासनगर : फेसबुकवरील मैत्रिणीने सोन्याची चेन, लॅपटॉप, आयफोन व घड्याळाचा फोटो दाखवला व त्या गोष्टी युकेमधून गिफ्ट पाठविल्याचे सांगून ...
उल्हासनगर : फेसबुकवरील मैत्रिणीने सोन्याची चेन, लॅपटॉप, आयफोन व घड्याळाचा फोटो दाखवला व त्या गोष्टी युकेमधून गिफ्ट पाठविल्याचे सांगून कस्टम फी ऑनलाइन भरण्यास सांगून ५ लाख रुपयांची महेश राजांनी यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारे महेश राजांनी यांना फेसबुकवरील जेसिक विल्यम्स नावाच्या मैत्रिणीने सोन्याची चेन, लॅपटॉप, घड्याळ व आयफोनचा फोटो व्हॉट्सॲप नंबरवर पाठवला आणि परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. गिफ्टवरील कस्टम फी विना मैड या नावाने दिलेल्या बँक खात्यात ऑनलाइन जमा करण्यास सांगितले. महेश राजांनी ५ लाख ४९९ रुपये रुपये ऑनलाइन पाठविले. हा प्रकार २७ जुलै ते ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला असून महेश यांना फसवणूक झाल्याचे समाजले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जेसिका विल्यम्स व विना मैड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.