मित्राची दगडाने ठेचून हत्या

By admin | Published: March 5, 2017 03:26 AM2017-03-05T03:26:36+5:302017-03-05T03:26:36+5:30

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्र . ६ वर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास संतोष पुजारी (३५, रा. कळवा) याची मित्राने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी

The friend's crushed stone crushed | मित्राची दगडाने ठेचून हत्या

मित्राची दगडाने ठेचून हत्या

Next

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्र . ६ वर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास संतोष पुजारी (३५, रा. कळवा) याची मित्राने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सच्चा ऊर्फ सचिन हमाल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अनैतिक संबंधांतून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
सचिन आणि संतोष हे दोघे मित्र होते. एका चोरीच्या प्रकरणात संतोष जेलमध्ये होता. तो काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला होता. तो जेलमध्ये असताना त्याच्या पत्नीशी सचिनचे सूत जुळले होते. त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. याची माहिती संतोषला समजली. जेलमधून सुटल्यानंतर त्याची पत्नी सचिनला सोडून पुन्हा संतोषकडे गेली. यामुळे सचिन संतापला होता. त्यामुळे त्याने संतोषचा काटा काढण्याचे ठरवले.
शुक्रवारी रात्री ते भेटले. त्यानंतर, पार्टी केली. दारूमुळे संतोषला झोप येऊ लागली. तेव्हा, त्याला सचिनने कल्याण स्टेशनच्या ६ नंबर फलाटावर नेले. तो गाढ झोपल्याची खात्री होताच सचिनने डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. संतोष ठार झाल्यानंतर तो तेथून फरारी झाला.
लोहमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. पोलीस सचिनचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पाबळे यांनी सांगितले की, आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन लवकरच त्याला बेड्या ठोकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

- मित्र तुरूंगात अनैतिक संबंध निर्माण झालेली त्याची पत्नी पुन्हा त्याच्याकडे गेल्याच्या रागातून ही हत्या झाली. मित्राला दारू पाजून नशेत तो झोपल्यावर डोय्कात दगड घालून निर्घृणपणे ही हत्या झाली.

Web Title: The friend's crushed stone crushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.