...अन् पाण्याच्या नळातून चक्क बेडूक बाहेर आले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 01:21 AM2020-04-25T01:21:00+5:302020-04-25T07:08:13+5:30

दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

frog came out from water tap in poladpur | ...अन् पाण्याच्या नळातून चक्क बेडूक बाहेर आले

...अन् पाण्याच्या नळातून चक्क बेडूक बाहेर आले

Next

पोलादपूर : पोलादपूर नगरपंचायतीत पाणी फिल्टरेशन होत नसल्याने जैसे थे पाणीपुरवठा होत आहे. त्यातच ज्या ठिकाणी पाणी उचलले जाते ते तळाला गेल्याने मोटरद्वारे पाइपमधून दूषित पाणी येत असून पाण्यासह बेडूक नळातून बाहेर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शहारातील शिवाजीनगर येथील आनंद पांढरकामे याच्या घरातील नळाच्या पाण्यात शुक्रवारी सकाळी लहान बेडकाचे पिल्लू आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील पाणीपुरवठा करण्यात येणारे पाणी थेट येत असल्याने ते फिल्टर करण्यात येणे गरजेचे आहे. मात्र हा प्लांट नसल्याने सरसकट पाणीवाटप होत आहे. ज्या भागातून पाणी येते त्या ठिकाणचे पाणी कमी झाल्याने पाण्यासह बेडूक इतर जंतू येत असल्याचे सांगण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी साठवण टाकीसह इतर नळ पाणीपुरवठा करणाऱ्या साहित्याची सफाई होणे गरजेचे आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणची सफाई रखडली आहे. अनेक नळ जमिनीखालून गटारातून गेले आहेत; तर काही ठिकाणी पाणी वाहून नेणारे पाइप गंजून गेले आहेत. अशा ठिकाणी अनेकदा पाण्याद्वारे जंतू, कीटक वाहत थेट नळाद्वारे येत आहेत.

कोरोनामुळे कामांना स्थगिती असल्याने साठवण टाकी व फिल्टरचे काम करता आले नाही. जलवाहिनी विस्तारवहिनी यातून आलेले बेडूक ही गंभीर बाब असल्याने जाळी लावून वॉश आऊट करून घेऊन योग्य ते निवारण करू, अशी माहिती माजी नगराध्यक्ष नीलेश सुतार यांनी दिली.

साठवण टाकी, जलशुद्धीकरणाची मागणी
पोलादपूर मनसेच्या वतीने मुख्याधिकारी पोलादपूर यांना पाणीपुरवठा करणाºया वाहिन्या दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून साठवण टाकी व जलशुद्धीकरणाच्या तपासणीसह दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: frog came out from water tap in poladpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.