काशीमीरा वरून मुर्धा - पॅगोडा साठी बस सुरु करा
By धीरज परब | Published: August 13, 2023 02:54 PM2023-08-13T14:54:23+5:302023-08-13T14:54:47+5:30
काशीमीरा येथुन मुर्धा व पुढे गोराई पॅगोडा पर्यंत मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या बस सोडण्यात याव्यात अशी मागणी आदर्श सेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल भगत यांनी केली आहे .
मीरारोड - काशीमीरा येथुन मुर्धा व पुढे गोराई पॅगोडा पर्यंत मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या बस सोडण्यात याव्यात अशी मागणी आदर्श सेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल भगत यांनी केली आहे .
काशीमीरा हे शहराचे मुख्य प्रवेशद्वार असून मुंबई , ठाणे , वसई - विरारच्या दिशेने ये - जा करणाऱ्या मार्गाचे मुख्य जंक्शन आहे . त्यामुळे काशीमीरा पासून गोराई पॅगोडा बस सेवा सुरु केल्यास भाईंदर पश्चिम , मुर्धा , राई , मोरवा , डोंगरी , उत्तन , गोराई चौपाटी , गोराई गाव व पॅगोडा येथे जाणाऱ्या नागरिकांना प्रवासाची चांगली सुविधा मिळणार आहे .
सध्या काशीमीरा व मीरारोड भागातून मुर्धा - उत्तन - गोराईच्या दिशेने जाण्यासाठी बस सेवा नसल्याने नागरिकांना भाईंदर रेल्वे स्थानक येथे जावे लागते . त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जातो . महापालिके कडे सध्या ७४ बस असून त्याच अपुऱ्या पडत आहेत . नवीन ५७ बस येणार असल्या तरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात १० बस व नंतर टप्याटप्याने बस मिळणार आहेत . त्यामुळे नवीन बस आल्या शिवाय नव्याने बस मार्ग सुरु करण्यास प्रशासन असमर्थता व्यक्त करत आले आहे .