Mira Road: घरकाम करणाऱ्या महिलेची एजंट सह महिलेने केली फसवणूक 

By धीरज परब | Published: March 1, 2023 10:40 PM2023-03-01T22:40:01+5:302023-03-01T22:43:56+5:30

Mira Road: एका महिले कडून दोघा इस्टेट एजंटच्या माध्यमातून घर खरेदी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेची फसवणूक झाली आहे . खरेदी केलेल्या घरावर आधीच बँकेचे कर्ज असल्याचे उघडकीस आल्यावर भाईंदर पोलिसांनी महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

From modelling, anchoring, TikTok star to BJP leader, know who was Sonali Phogat | Mira Road: घरकाम करणाऱ्या महिलेची एजंट सह महिलेने केली फसवणूक 

Mira Road: घरकाम करणाऱ्या महिलेची एजंट सह महिलेने केली फसवणूक 

googlenewsNext

मीरारोड -  एका महिले कडून दोघा इस्टेट एजंटच्या माध्यमातून घर खरेदी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेची फसवणूक झाली आहे . खरेदी केलेल्या घरावर आधीच बँकेचे कर्ज असल्याचे उघडकीस आल्यावर भाईंदर पोलिसांनी महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्ली जनता नगर मध्ये दोन मुलांसह राहणाऱ्या सुनंदा सोहान ह्या घरकाम करून कुटुंब चालवतात . त्या राहतात ते घर भाड्याचे होते व कमलेश शाह आणि संजय तिवारी या इस्टेट एजंटनी चार वर्षां पूर्वी ते मिळवून दिले होते . घराची मूळ मालकीण रेणुका पटेल व तिचा पती दिनेशकुमार यांना घर विकायचे होते मात्र ते विकले जात नव्हते . त्यामुळे सुनंदा यांनी घर विकत घेण्याची तयारी दर्शवली व ९ लाख ५० हजारात सौदा ठरला . सुनंदा यांनी भाड्याच्या वेळी अनामत रक्कम म्हणून ३ लाख दिले होते . ती रक्कम वजा करून उर्वरित ६ लाख ५० हजार थोडे थोडे करून त्यांनी दिले.

कमलेश आणि तिवारी यांच्या माध्यमातून रेणुका व दिनेशकुमार पटेल यांनी सुनंदा यांना घर नोंदणी करून विकत दिले .  मात्र काही दिवसांनी बेसिन कॅथॉलिक बँकेचे कर्मचारी आले आणि सदर घरावर ७ लाख १५ हजारांचे कर्ज असल्याचे सांगितले . सुनंदा बँकेत गेल्या असता , सदर घराची मूळ खरेदी करारनामे बँके कडे असताना तुम्हाला खोटी कागदपत्रे देऊन नोंदणी केल्याचे सांगण्यात आले . आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने सुनंदा यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार केली . मात्र पोलिसांनी केवळ रेणुका पटेल हिलाच आरोपी केले आहे . 

Web Title: From modelling, anchoring, TikTok star to BJP leader, know who was Sonali Phogat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.