खराब रस्त्याच्या निषेधार्थ व्यापा-यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 06:23 AM2017-09-13T06:23:59+5:302017-09-13T06:23:59+5:30
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघाच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढला.
अंबरनाथ : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघाच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढला.
या मोर्चात व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी धल, सचिव अजित म्हात्रे, गुलाब करंजुले, युसूफ शेख, हितेश कोठारी, सुजाता भोईर आदी व्यापारी सहभागी झाले होते. अंबरनाथ पालिकेच्या नाकावर टिच्चून खड्डे व दोन वर्षात कल्याण- बदलापूर काँक्रीटीकरणाची वाताहत झाली या आशयाच्या दोन बातम्या ‘लोकमत’च्या ‘हॅला ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत व्यापारी संघनटेने पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी पालिकेचे अधिकारी दीपक चव्हाण यांना व्यापाºयांनी निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेऊन हा विषय मुख्याधिकाºयांसमोर मांडला जाईल असे आश्वासन चव्हाण यांनी मोर्चाला दिले.
स्टेशन रोड, रेल्वे उड्डाणपूलावर खड्डे पडले आहे. त्याचबरोबर शिवमंदिर रस्ता, वडवली रस्ता या ठिकाणी खड्डे पडले आहेत.
रस्त्यांची दुरूस्ती त्वरित करण्यात यावी, खड्डे बुजवण्यात यावेत या मागण्या व्यापाºयांकडून करण्यात आल्या. त्याचबरोबर स्टेशन परिसरातील दुकानासमोर बेकायदा रिक्षातळ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ग्राहकाला दुकानात येण्यासाठी अडचणी होत आहे. त्यामुळे दुकानदारांना नुकसान सहन करावे लागत आहेत. बेकायदा रिक्षातळ हटवण्यात यावेत या मागणीचाही उच्चार करण्यात आला.