पतीच्या निधनाने वैफल्यग्रस्त महिलेची आत्महत्या
By जितेंद्र कालेकर | Updated: July 27, 2023 21:27 IST2023-07-27T21:27:22+5:302023-07-27T21:27:30+5:30
याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी दिली.

पतीच्या निधनाने वैफल्यग्रस्त महिलेची आत्महत्या
ठाणे : वर्षभरापूर्वी पतीचे निधन झाल्यामुळे वैफल्यग्रस झालेल्या फाल्गुनी मयूर उपाध्याय (वय ४२) या महिलेने ठाण्यातील कासारवडवलीतील इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी दिली.
फाल्गुनी ही मुंबईतील घाटकोपर भागात वास्तव्याला होत्या. वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीने निधन झाल्याने त्या नैराश्यात होत्या. त्यांचा ठाण्यातील भाऊ नामे पूर्वेश त्रंबकलाल व्यास (३७) याच्याकडे त्या अलीकडेच आल्या होत्या. त्यांच्या कासारवडवलीतील हावरे सिटीमधील प्रकृती हाइटसमधील सोळाव्या मजल्यावरील १६०३ क्रमांकाच्या घरातील खिडकीतून कोणाला काही न सांगता नैराश्यातून त्यांनी खाली उडी घेतल्याचे त्यांचा भाऊ पूर्वेश यांनी पोलिसांना सांगितले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले.