‘अपक्ष’ ठरणार प्रस्थापितांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2015 03:14 AM2015-10-21T03:14:28+5:302015-10-21T03:14:28+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल ७५० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यंदा बहुपक्षीय लढत होत असली तरी यात उभे ठाकलेले २५२ अपक्ष उमेदवार

Frustrating for the proposers to be 'independent' | ‘अपक्ष’ ठरणार प्रस्थापितांसाठी डोकेदुखी

‘अपक्ष’ ठरणार प्रस्थापितांसाठी डोकेदुखी

Next

- प्रशांत माने,कल्याण
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल ७५० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यंदा बहुपक्षीय लढत होत असली तरी यात उभे ठाकलेले २५२ अपक्ष उमेदवार प्रस्थापितांसाठी एकप्रकारे डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. परिणामी होणारे मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. केडीएमसीच्या १२२ प्रभागांपैकी तीन प्रभागातील उमेदवार बिनविरोध तर अन्य दोन प्रभागांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे ११७ प्रभागांत निवडणूक होत आहे. .
यंदा शिवसेना -भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असताना आघाडी होऊनही काँग्रेस-राष्ट्रवादीत उमेदवार उभे करण्यावरून वाद सुरू आहे. मनसेदेखील स्वबळावर लढत असून रिपाइं, बसपा, बहुजन विकास आघाडी, कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, मार्क्सवादी पक्ष, भारीप बहुजन महासंघ, समाजवादी पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक, एमआयएम या पक्षांच्या उमेदवारांसह तब्बल २५२ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. केडीएमसी निवडणुकींचा इतिहास पाहता निवडून येणाऱ्या अपक्षांची भूमिका सत्ताकारणात नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेने अपक्षांच्या मदतीने सत्तेचा पहिला झेंडा महापालिकेवर फडकविला होता. २००५ च्या निवडणुकीतही अपक्षांच्या सहकार्याने युतीच्या सत्तेला सुरूंग लावून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता केडीएमसीत आली होती. त्याच अपक्षांच्या साथीने अडीच वर्षानी पुन्हा एकदा सत्ता पटकाविण्यात युतीला यश आले होते. २०१० च्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहीली असलीतरी अपक्षांच्या बळावर शिवसेना भाजपा सत्तारूढ झाली होती. यंदाच्या निवडणुकीत २५२ अपक्ष उमेदवार उभे ठाकले आहेत. मागील निवडणुकांचे चित्र पाहता २०१५ च्या सत्तेची गणितही अपक्षांवर ठरण्याची दाट शक्यता आहे. बहुपक्षीय लढतीमुळे मतांचे विभाजन होणार असले तरी अपक्षांचा यात मोठा वाटा असणार यात शंका नाही.

Web Title: Frustrating for the proposers to be 'independent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.