पश्चिम बंगाल येथील बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 11:41 PM2021-06-04T23:41:38+5:302021-06-04T23:42:43+5:30

पश्चिम बंगाल येथील बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी मलिक फकीर मिर उर्फ नेया (५०) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. त्याला ताब्यात घेण्याबाबतची माहिती पश्चिम बंगाल पोलसांना देण्यात आली आहे.

Fugitive accused in West Bengal bomb blast arrested | पश्चिम बंगाल येथील बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी जेरबंद

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

Next
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पश्चिम बंगाल येथील बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी मलिक फकीर मिर उर्फ नेया (५०) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. त्याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पश्चिम बंगालमधील बरईपूर जिल्हयातील बासंती पोलीस ठाण्यात मलिक याच्याविरुद्ध स्फोटक कायदा कलम ३,४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. तो ठाणे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ४ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सापळा रचून त्याला रेल्वे स्थानक भागातून या पथकाने ताब्यात घेतले. सध्या तो नवी मुंबईतील पापडीपाडा, तळोजा या भागात वास्तव्याला होता. त्याची न्यायालयीन कोठडी घेण्यात आली असून त्याला ताब्यात घेण्याबाबतची माहिती पश्चिम बंगाल पोलसांना देण्यात आली आहे.

Web Title: Fugitive accused in West Bengal bomb blast arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.