१८ जणांच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदरी सरकारची- राजन विचारे
By जितेंद्र कालेकर | Published: August 13, 2023 08:42 PM2023-08-13T20:42:41+5:302023-08-13T20:42:48+5:30
रविवारी कळवा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बाेलत हाेते.
ठाणे:कोविड काळात कसलीच कमतरता नव्हती. मात्र आता लोकप्रिनिधी नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे. अशी टिका ठाण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली.रविवारी कळवा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बाेलत हाेते.
या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी एक जण आहे. कोविड काळात सुरू असलेली यंत्रणा पूर्ववत करा. असे सांगत.पार्कींग प्लाझा येथे १०० बेड चे रुग्णालय तत्काळ सुरू करावे.अशी मागणी विचारे यांनी केली. कळवा रुग्णालयात अपुरी कर्मचारी संख्या असल्याने तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणीही त्यांनी केली.
मुख्यमंत्री ठाण्यात राहतात परिणामी आरोग्य सेवा पुरवणे त्याचे कर्तव्य आहे. त्यांनी बाकीची कामे बाजूला ठेवावी आणि लोकांचे जीव वाचवावे, असा टोलाही विचारे यांनी लगावला. या १८ जणांच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदरी सरकारची आहे. गतिमान सरकार असूनही आरोग्य यंत्रणा फेल दिसत असल्याची टिकाही विचारे यांनी केली.