लहान थोरांनी लुटली दुबिर्णीतून आकाश दर्शन पाहण्याची मजा, गुरू ग्रह आणि रोजचा दिसणाऱ्या चंद्राचा केला अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:56 PM2018-04-30T16:56:06+5:302018-04-30T17:06:00+5:30
अॅमॅच्युअर अॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म आयोजित केला होता. यात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकाशाचे दर्शन पाहण्याची संधी मिळाली.
ठाणे : लहान थोरांनी दुबिर्णीतून आकाश दर्शन पाहण्याची मजा लुटली. यावेळी त्यांना रोजच्या दिसणाºया आपल्या चांदोबावर अनेक विवरं तर गुरू ग्रह आणि त्याचे चार चंद्र आढळून आले.
अॅमॅच्युअर अॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म आयोजित करण्यात आला. लोकांमध्ये खगोलशास्त्राविषयी जागृती व्हावी, ज्योतिषशास्त्रापेक्षा विज्ञानावर विश्वास असावा, अंधश्रद्धेपासून दूर जाऊन दुबिर्णीतून दिसणाºया गोष्टी खºया असतात हे त्यांना पटवून द्यावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला होता. सुर्यमालेबद्दल माहिती देत कार्यक्रमास सुरूवात झाली. जवळपास ४०० ठाणेकर या आकाश दर्शनासाठी जमले होते. यात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह तरुणांची संख्या लक्षणीय होती. काही मुले चक्क आपल्या पालकांना घेऊन आली होती. ताºयांचे प्रकार, विश्वाची निमिर्ती याबद्दल माहिती देत शहरामध्ये दिसणारा आकाश व शहराच्या बाहेर दिसणारा आकाश यातील फरक त्यांना फोटोद्वारे समजावून सांगितला. हे सर्व विषय प्रेक्षक आवडीने ऐकत होते. आकाशातील फरक याबद्दल त्यांना अधिक रस वाटत होता. क्लबचे संस्थापक सदस्य उमेश घुडे, अमोल कुलकर्णी व अमित पाटणकर, सलील घारपुरे या चारही तरुणांनी उपस्थितांना मुद्देसुद माहिती दिली. या क्षेत्रातील करिअरमध्ये असलेल्या संधीबद्दल ही त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. आकाश दर्शन घडल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर होता. आकाश दर्शनासाठी विज्ञानाची आवड असणेच आवश्यक नाही तर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती यात येऊ शकतो असे आयोजक राजेश मोरे यांनी सांगितले.