संदप स्मशानभूमीच्या डागडुजीसाठी १४ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:06+5:302021-03-06T04:38:06+5:30
डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील संदप भागातील स्मशानभूमीच्या डागडुजी व सुशोभिकरणाच्या कामाला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंजुरी दिली ...
डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील संदप भागातील स्मशानभूमीच्या डागडुजी व सुशोभिकरणाच्या कामाला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंजुरी दिली असून या कामासाठी १४ लाख २४ हजार ४०३ रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. सहा महिन्यांत हे काम पूर्ण करावे असे, आदेशही २ मार्च रोजी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी काढले आहेत.
या स्मशानभूमीसाठी भोपरच्या माजी नगरसेविका रविना माळी यांनी प्रयत्न केले होते. आयुक्त, अभियंत्यांनी त्यास मंजुरी दिल्याने माळी यांनी समाधान व्यक्त केले. संबंधित कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी ठळक अक्षरात कामाचा कालावधी, कंत्राटदाराचे व कंपनीचे नाव, निविदा रक्कम तसेच संपर्क क्रमांक असा तपशील काम सुरू करण्याआधी आणि ते संपुष्टात येईस्तोवर फलक लावण्यात यावा, तो दर्शनी भागात ठेवावा, असेही सांगितले आहे. ते काम सुरू होताच आगामी काही महिन्यांत त्या स्मशानभूमीत होणारी गैरसोय कमी होण्यास सहाय्य होणार असल्याचे अमर माळी म्हणाले.
-------------------