फ्युनिक्युलर रेल्वेला आणखी १० महिने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:51 AM2018-02-03T06:51:06+5:302018-02-03T06:51:24+5:30

मलंग गडावरील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेचे काम पूर्ण होण्यास अजून दहा महिने लागण्याची आणि डिसेंबरमध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या रेल्वेच्या रुळांच्या नऊ पिलरपैकी अवघ्या तीनचे काम पूर्ण झाले आहे.

Funicular train for another 10 months? | फ्युनिक्युलर रेल्वेला आणखी १० महिने?

फ्युनिक्युलर रेल्वेला आणखी १० महिने?

Next

- अनिकेत घमंडी
डोंबिवली - मलंग गडावरील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेचे काम पूर्ण होण्यास अजून दहा महिने लागण्याची आणि डिसेंबरमध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या रेल्वेच्या रुळांच्या नऊ पिलरपैकी अवघ्या तीनचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या पिलरपैकी त्यापैकी तीन अवघड, तर अन्य तीन तुलनेने उभारण्यास सोपे असल्याची माहिती रुळांचे काम करणारे तज्ज्ञ सल्लागार, सह ठेकेदार वसंत जोशी यांनी दिली.
रूळांच्या पिलरच्या कामाला आणखी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार असून ते मे महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे जोशी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रुळांची उभारणी, डबे, त्यांची रितसर चाचणी, तपासण्या कराव्या लागतील. पावसाळ््यात धुके, पावसाच्या सरींमुळे तेथे काम करणे फारसे शक्य होत नाही. त्यामुळे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अन्य तांत्रिक कामे होतील. तसेच वरच्या भागातील स्टेशनची बांधणी होईल. ही कामे पूर्ण होण्यास दिवाळी उजाडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे २२ एप्रिलपासून या प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली. पण तेव्हाही ठेकेदाराने दिलेली मुदत टळली. त्यामुळे ‘लोकमत’ने पाठपुरावा केला असता ही माहिती समोर आली. गेल्यावर्षीच्या भेटीवेळी जोशी यांच्यासह शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, गटविकास अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
२००८ पासून सुप्रीम कंपनीने सुरु केलेले काम आर्थिक मुद्द्यांमुळे बंद पडले होते. ते सुरू होत नसल्याने कंपनीला काळ््या यादीत का टाकण्यात येऊ नये, असा सवाल खासदार शिंदेंनी केली होता. त्याची नोंद घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनीला तंबी देत संधी दिली. पण अजून काम पूर्ण झालेले नाही. मध्यंतरी पालकमंत्री शिंदेंच्या दालनात बैठका झाल्या आणि पुन्हा कामास सुरुवात झाली. मात्र काम पूर्ण होण्यास साधारणत: डिसेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रकल्पाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के काम सुरू आहे. प्रकल्प ८० कोटींचा असून त्यातील सुमारे १० कोटींचा निधी मिळणे शिल्लक होते. आताही नऊ कोटींचे काम बाकी आहे. गेल्या दहा महिन्यात अवघ्या एक कोटींच्या खर्चाचे काम झाले आहे. त्यामुळे मे महिन्यापूर्वी रूळांसह महत्वाचे काम झाले, तरच पावसाळ््यानंतर स्टशन तांत्रिक कामे पूर्ण करून रेल्वेच्या चाचण्या सुरू करता येतील आणि वर्षअखेरीस ही रेल्वे धावेल, असा अंदाज आहे.

सुप्रीम कंपनीने हे काम हाती घेतले. पण निधी वेळेवर न मिळाल्याने ते वेळोवेळी रखडले. हा प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्यास केवळ कंपनी जबाबदार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात त्यासंदर्भात वेळोवेळी बैठका झाल्या. त्यात त्यांना काळया यादीत टाकण्याचा प्रस्ताव आला होता. पण त्यांना एक संधी देण्यात आली असून आता काम सुरु झाले आहे. ते मे महिन्यात पूर्ण होऊन पावसाळ््यानंतर पर्यटकांसह मलंग भक्तांना रेल्वेची सुविधा मिळेल.
- श्रीकांत शिंदे, खासदार

Web Title: Funicular train for another 10 months?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.