फीवाढीप्रश्नी भाजपाही मैदानात
By admin | Published: April 27, 2017 11:54 PM2017-04-27T23:54:22+5:302017-04-27T23:54:22+5:30
बदलापूरमधील खाजगी शाळांमधील मनमानी फी आकारणीच्या मुद्यावर मनसेने आक्र मक पवित्रा घेतल्यानंतर आता भाजपाही
बदलापूर : बदलापूरमधील खाजगी शाळांमधील मनमानी फी आकारणीच्या मुद्यावर मनसेने आक्र मक पवित्रा घेतल्यानंतर आता भाजपाही याच प्रश्नावर मैदानात उतरली आहे. भाजपा गटनेते व नगरसेवकांनी नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन मनमानी पद्धतीने फी वाढ करणाऱ्या बदलापूरमधील खाजगी शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कार्मेल शाळेत इमारत बांधण्यासाठी पाच हजार देण्याची सक्ती होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी होत्या. याची दखल घेऊन मनसेने शाळेत जाऊन याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला शाळा व्यवस्थापनाकडून चर्चेस नकार मिळाल्याने मनसेने आक्र मक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर, पोलिसांच्या मध्यस्थीने चर्चा झाली. या चर्चेत शाळा व्यवस्थापनाकडून इमारतीच्या निधीसाठी कोणतीही सक्ती करणार नसल्याचे मान्य करण्यात आले. यापुढे अशी सक्ती झाल्यास पालकांनी मनसे कार्यालयाशी संपर्कसाधावा, असे आवाहन मनसे शहराध्यक्ष उमेश तावडे यांनी केले. दरम्यान, बदलापूर शहर भाजपाच्या वतीने गटनेते राजेंद्र घोरपडे, नगरसेवक किरण बावस्कर व प्रशांत कुलकर्णी यांनी तावडे यांची भेट घेऊन मनमानी पद्धतीने फीवाढ करणाऱ्या खाजगी शाळांवर कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)