भिवंडीत पसरले घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:11 AM2018-08-29T04:11:46+5:302018-08-29T04:12:15+5:30

कचराकुंड्या ओव्हरफ्लो : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाविरोधात संताप

The furious spreads the dirt kingdom | भिवंडीत पसरले घाणीचे साम्राज्य

भिवंडीत पसरले घाणीचे साम्राज्य

Next

भिवंडी : शहरातील कचराकुंडीतील कचरा नियमित उचलला जात नसल्याने ऐन पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणी कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. तसेच कचरा उचलल्यानंतर जंतुनाशके न फवारल्याने शहरात परलेल्या दुर्गंधीने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

शहरात घंटागाडी, डम्पर, जेसीबी आणि कंत्राटदारांच्या कामगारांकडून कचरा उचलला जात आहे. महापालिकेचे एकूण पाच प्रभाग आहेत. त्यापैकी प्रत्येक प्रभागासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली असून त्यांना नियमित व सुटीच्या दिवशीही कचरा उचलण्यासाठी सांगितले आहे. तरीही ऐन सणाच्या दिवशी व सरकारी सुटीच्या दिवशी घंटागाडी घरोघरी येत नसल्याने नागरिकांच्या घरांत कचरा साचून राहतो. तर कचराकुंडीतील कचरा जेसीबी व डम्परने न उचलल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंडीत किंवा लोकवस्तीतील कुंडीत कचरा नेहमी साचलेला दिसतो.
आरोग्य विभागात जेसीबी आणि डम्परच्या नोंदीपेक्षा कमी वाहने शहरात कचरा उचलत असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या सर्व वाहनांचा नियमित कामाचा तपशील आरोग्य विभागाने ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरात जैन र्र्ध्मियांचे उपवास सुरू असल्याने काही मंदिराजवळील दुर्गंधी दूर करण्यासाठी जंतूनाशके फवारणी करण्याची मागणी केली असता तेथे पालिकेच्या आरोग्य विभागाने जंतूनाशके न फवारता धुराची फवारणी केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

दरवर्षी खरेदी केलेले जंतुनाशक औषधे कुठे जातात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात जंतूनाशक औषधे फवारणी न करता पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून कंत्राटदारांना पाठिशी घालणाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.

कचरा उचलण्याचे दिले आदेश
शहरातील कचºयाचे नियोजन बकरी ईदमुळे ढासळले असून त्यामुळे नागरी वसाहतीतील कचराकुंडीत कचरा साचला आहे. हा कचरा उचलण्यासाठी कंत्राटदारांना आदेश दिले आहेत. लवकरच हा कचरा उचलला जाईल,अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी यांनी देऊन जंतुनाशक औषधांचा तपशील देण्याचे टाळले.

Web Title: The furious spreads the dirt kingdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.