ठाणे वागळे इस्टेटमधील जि.प.च्या नूतन कार्यालयाचे फर्निचर पूर्ण; फेब्रुवारीत स्थलांतर!
By सुरेश लोखंडे | Published: January 23, 2024 04:49 PM2024-01-23T16:49:15+5:302024-01-23T16:49:52+5:30
जिल्ह्यातील गांवपाड्याच्या सर्वांगिण विकासा करीता ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यालय सतर्क आहे.
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. जुनी इमारत चार वर्षापूर्वीच पाडलेली आहे. मात्र आता वागळे इस्टेटमधील एका कंपनीची इमारत भाड्याने मिळालेली असून तेथील फर्निचरचे कामही जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाजवळील जिल्हा परिषदेचे कार्यालय आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थलांतर हाेण्याचा मार्ग आता माेकळा झाला आहे.
जिल्ह्यातील गांवपाड्याच्या सर्वांगिण विकासा करीता ठाणेजिल्हा परिषदेचे कार्यालय सतर्क आहे. मात्र या जिल्हा कार्यालयाची इमारत धाेकादायक झाल्यामुळे ती पाडलेली आहे. बाजारपेठेतील या इमारतीच्या जुन्या जागेवरच आता भव्य इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी वागळे इस्टेट येथील भाड्याच्या इमारतीत या जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयाचे स्थलांतर हाेऊ घातले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्द सुरू झालेल्या किसननगर परिसराला लागून असलेल्या या एमआयडीसीतील बंद कंपनीच्या तीन मजली इमारतीत या जिल्हा परिषदेचे कामकाज आता सुरू हाेईल. त्यासा अनुसरून या इमारतीत फर्निचरचे संपूर्ण काम आटाेक्यात आल्याचे जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांना वागळे इस्टेट राेड नंबर १६ येथील एक खासगी कंपनीच्या तीन मजली इमारतीत हलवण्यात येत आहे. महिन्याभरात ही सर्व कार्यालयने या भाड्याच्या जागेत जाणार असून त्यासाठी या इमारतीची रंगरंगाेटी व डागडुजी, फर्निचरचे काम हाती घेण्यात आलेल आहे.
वागळे इस्टेटजवळील पासपाेर्ट ऑफिसच्या जवळ राेडनंबर १६ येथील या जुन्या, बंद पडलेल्या कंपनीची २५ हजार स्केव्हेर फूट जागा जिल्हा परिषदेने भाड्याने घेतली आहे. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचे दालनांची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. याशिवाय वेळाेवेळी हाेणाऱ्या सभा, बैठकांसाठी भव्य सभागृहाचे नियाेजनही या इमारतीत असून सुसज्य पार्कींग व्यवस्थाही आहे. तब्बल तीन वर्षासाठी भाड्याने धेतलेल्या या इमारतीमध्ये मात्र आगामी निवडून येणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवास व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे.