सफाई कामगारांच्या जीवाशी खेळ
By admin | Published: May 30, 2017 05:46 AM2017-05-30T05:46:06+5:302017-05-30T05:46:06+5:30
महापालिका कार्यक्षेत्रात सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात नालेसफाई सुरू आहे. मात्र, ती क रणाऱ्या सफाई कामगारांकडे योग्य ते
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिका कार्यक्षेत्रात सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात नालेसफाई सुरू आहे. मात्र, ती क रणाऱ्या सफाई कामगारांकडे योग्य ते संरक्षणात्मक साहित्य तसेच सुविधा नसल्याने ही नालेसफाई म्हणजे सफाई कामगारांच्या जीवाशी खेळ असल्याचे दिसत आहे. ही बाब काँग्रेसने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
ठाणे शहर काँग्रेसचे ब्लॉक क्रमांक-९ चे अध्यक्ष संदीप संभाजी शिंदे यांनी यापूर्वी भुयारी गटारांची साफसफाई करताना व गाळ काढताना विषारी वायूमुळे आणि प्राणवायूअभावी कित्येक कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
तसेच सफाई कामगार
कुजलेल्या कचऱ्यामुळे व त्यातील रोगजंतूंमुळे सतत आजारी पडत आहेत. त्यांना कोणीही वाली नाही. या गरीब कायम व कंत्राटी कामगारांसाठी तोंडाला मास्क, प्लास्टिक-रबराचे हातमोजे आणि प्राणवायूचे सिलिंडर याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजपाची तीन वर्षे, ३० थापांची
भाजपा सरकारने तीन वर्षांत काय केले असेल, तर मोठमोठी जाहिरातबाजी आणि काँग्रेस पक्षाने केलेल्या कामांचे उद्घाटन केले. भाषणों के शेर और नतिजों के ढेर, असलेल्या भाजपाने तीन वर्षांत ३० थापा मारल्याचा आरोप करून येत्या दोन वर्षांत काँग्रेस त्यांच्याविरोधात व्यापक आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
मोदी सरकारचा ३ वर्षांचा प्रवास म्हणजे ३० थापा. मोदींनी निवडून येण्यापूर्वी केलेल्या घोषणा के वळ बहाणे असल्याचे या कार्यकाळात स्पष्ट झाले आहे. या सरकारने फक्त फसवणूक केली आहे. त्यातच ढासळलेली अर्थव्यवस्था. वाढती बेरोजगारी, शेती आणि उद्योगांची पीछेहाट अशांमध्ये मोदी सरकार तीन वर्षांचा जल्लोष साजरा करत आहे.
याचदरम्यान, मोदी सरकारचा मेकअप उतरवून खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी काँग्रेस पुढील दोन वर्षांत व्यापक आंदोलन पुकारणार आहे. झूट बोलो, बार बार बोलो, हे मोदी सरकारचे ब्रीद असून ते लोकांची एकदाच फसवणूक करू शकतात.
मार्केटिंग आणि जल्लोष ही भाजपाची कार्यपद्धती आहे. या जल्लोषासाठी पैसा येतो कोठून, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर, संजय चौपाने, सुभाष कानडे, ठामपा परिवहन सदस्य सचिन शिंदे आदी उपस्थित होते.