प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! 'धुम्रपानास सक्त मनाई'ची लोकलमध्ये सिगारेट ओढून रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पायमल्ली  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 02:46 PM2017-10-19T14:46:17+5:302017-10-19T14:46:27+5:30

रेल्वे कर्मचारीच लोकलमध्ये सिगारेट ओढत असल्याची धक्कादायक घटना.

Games with the help of passengers! Railway staff forced to take cigarette in the locality of 'Dhumpanas' strict prohibition | प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! 'धुम्रपानास सक्त मनाई'ची लोकलमध्ये सिगारेट ओढून रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पायमल्ली  

प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! 'धुम्रपानास सक्त मनाई'ची लोकलमध्ये सिगारेट ओढून रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पायमल्ली  

Next

ठाणे - सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास सक्त मनाई आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बसेमध्ये विडी, सिगारेट, पान तंबाखू यापैकी कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आहे. यापेक्षाही रेल्वेचा कायदा तर अधिक कठोर आहेत. रेल्वेत तर सोडाच पण प्लॅटफार्मवरदेखील सिगारेट ओढण्यास सक्त मनाई आहे. हे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सर्वत्र नजर ठेवून असतात. यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात विडी, सिगारेट ओढणारे आढळून येत नाही. पण रेल्वेचेच कर्मचारी या नियमाला हरताळ फासताना दिसत आहेत. सिगारेट, विडी ओढण्यास सक्त मनाई असतानाही रेल्वे कर्मचारीच लोकलमध्ये बिनधास्तपणे पत्ते खेळत सिगारेट ओढताना दिसत आहेत. 

लोकल प्रवासाचे सर्व नियम रेल्वे कर्मचारीच धाब्यावर बसवत असल्याचे ( 18 ऑक्टोबर ) बुधवारच्या घटनेनं आढळून आले. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मुंबईहून आलेल्या या लोकलच्या फर्स्ट क्लास बोगी क्रमांक 1177A मधून बरेच अधिकारी व कर्मचारी प्रवास करत होते. बोगीतील दोन-तीन सीटवर कर्मचारी पत्ते खेळत होते. पत्ते खेळण्याच्या मनाईलाही न जुमानता हा खेळ सुरू होते. या स्लो लोकलने कळवा स्टेशन सोडल्यानंतर बोगीतील कल्याणकडील शेवटच्या सीटवरील घोळक्यातील एकानं तर सिगारेट पेटवून ती मनसोक्त ओढली. सिगारेट तोंडात ठेवून तो बिनधास्तपणे खेळतही होता. धक्कादायक बाब म्हणजे मुंब्रा स्टेशन सोडले तरीही त्यांच्या तोंडात सिगारेट होतीच. हा सर्व प्रकार लोकमतच्या प्रतिनिधीनं कॅमे-यामध्ये कैद केला. 

आग लागण्याच्या घटना घडू नये, यासाठी सतर्क राहणारे रेल्वे प्रशासनाचेच कर्मचारी मनमानी करुन संकटाला ओढावून घेत असल्याची ही घटना समोर आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या लोकलचे शेवटचे स्टेशन कल्याण आहे. पण या दरम्यानच्या प्रवासात कर्मचारी घोळक्याने एकत्र बसून पत्ते खेळण्यासह अनेक नियमांची पायमल्ली  करत असल्याचे निदर्शनात आले. असेल प्रकार वेळीच थांबवले गेले पाहिजेत, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांमधून केली जात आहे.

Web Title: Games with the help of passengers! Railway staff forced to take cigarette in the locality of 'Dhumpanas' strict prohibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.