गण्या जाधव जेरबंद; पोलिसांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:44 AM2017-08-01T02:44:44+5:302017-08-01T02:44:44+5:30

एरव्ही, एखाद्या गुंडाला अटक केल्यानंतर पोलिसांवर राजकीय दबाव यायला लागतो. परंतु, वर्तकनगरच्या रेकॉर्डवरील ‘टॉप २०’मधील कुख्यात गुंड गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला जेरबंद

Gana Jadhav Jerband; Police felicitation | गण्या जाधव जेरबंद; पोलिसांचा सत्कार

गण्या जाधव जेरबंद; पोलिसांचा सत्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एरव्ही, एखाद्या गुंडाला अटक केल्यानंतर पोलिसांवर राजकीय दबाव यायला लागतो. परंतु, वर्तकनगरच्या रेकॉर्डवरील ‘टॉप २०’मधील कुख्यात गुंड गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला जेरबंद केल्यानंतर राष्टÑवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे, दिगंबर ठाकूर, राधाबाई जाधवर आणि वनिता घोगरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पोलीस अधिकाºयांचा सत्कार केला.
यापूर्वीही महाराष्टÑ विघातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई झालेल्या गण्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी उकळणे, अपहरण, दरोडा आणि मारहाण करणे, असे २३ गंभीर गुन्हे वर्तकनगर, नौपाडा आदी पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. दहशतीमुळे त्यांची तक्रार करण्यासाठी कोणी पुढे धजावत नव्हते. चाकूच्या धाकावर एका रिक्षाचालकाचे दोन साथीदारांच्या मदतीने अपहरण करून त्याच्याकडून दीड हजाराची खंडणीही उकळली होती. या आणि अशा अनेक गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी विशेष पथक तयार केले होते. सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, हवालदार भूषण गावंड, माणिक आहेर आणि पोलीस नाईक हेमंत मोरे आदींच्या पथकाने सापळा रचून सिनेस्टाइल पाठलाग करून २९ जुलै रोजी त्याला पकडले. या कारवाईचे लोकमान्यनगरातील रहिवाशांनी जोरदार स्वागत केले असून जगदाळे यांच्यासह २० ते २५ रहिवाशांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात जाऊन विभागाचे सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरधर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. गण्याच्या माध्यमातून लोकमान्यनगर भागात महिला आणि तरुणांमधील गुंड टोळीची दहशत या कारवाईमुळे संपुष्टात आल्याचे जगदाळे म्हणाले.

Web Title: Gana Jadhav Jerband; Police felicitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.