उल्हासनगर महापालिकेची गांधीगिरी, लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे फुल देऊन स्वागत
By सदानंद नाईक | Published: September 19, 2022 04:40 PM2022-09-19T16:40:59+5:302022-09-19T16:41:35+5:30
उल्हासनगर महापालिका अधिकारी व कर्मचारी उशिरा येऊन लवकर घरी जात असल्याची चर्चा रंगली होती. अशा लेटलतीफ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई ऐवजी त्यांचे गांधीगिरीने स्वागत करण्याची संकल्पना ठरली.
उल्हासनगर : महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे, सामान्य विभागाचे सहायक आयुक्त अच्युत सासे यांनी सकाळी साडे १० वाजता प्रवेशद्वार जवळ उभे राहून लेटलतीफ कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. महापालिकेच्या गांधीगिरी स्वागतामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वेळेत येणार असल्याचे सांगितले.
उल्हासनगर महापालिका अधिकारी व कर्मचारी उशिरा येऊन लवकर घरी जात असल्याची चर्चा रंगली होती. अशा लेटलतीफ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई ऐवजी त्यांचे गांधीगिरीने स्वागत करण्याची संकल्पना ठरली. सोमवारी सकाळीं साडे वाजता मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे व सामान्य विभागाचे सहायक आयुक्त अच्युत सासे यांनी लेटलतीफ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे झेंडूचे फुल देऊन स्वागत केले. उपायुक्त नाईकवाडे यांच्या गांधीगिरीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओशाळल्यागत झाले. त्यांनी यानंतर उशिरा येणार नसल्याचे सांगितले. महापालिकेचा कार्यालयीन वेळ सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांचा आहे. तर सायंकाळी सव्वा सहा वाजता महापालिकेचा कार्यालयी वेळ संपतो. मात्र बहुतांश कर्मचारी कार्यालयीन वेळत येत नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती.
महापालिका कार्यालयीन वेळ ९ वाजून ४५ मिनिटं असताना उपायुक्त अशोक नाईकवाडे व सहायक आयुक्त अच्युत सासे यांनी ४५ पेक्षा जास्त लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. नाईकवाडे कार्यालयीन वेळेत ९ वाजून ४५ वाजता महापालिका प्रवेशद्वारा जवळ उभे असतेतर, अर्धेअधिक पेक्षा जास्त कर्मचाऱ्याची नोंद लेतळातीफ मध्ये झाली असती. यापूर्वी महापौर महापालिका प्रवेशद्वार जवळ उभे राहून लेटलतीफ कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली जात होती. लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यात येणार असल्याने, त्यांच्यावर कारवाईचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनीही लेटलतीफ कर्मचाऱ्या बाबत नाराजी व्यक्त करून कारवाईचे संकेटनदिले