कल्याणच्या कला केंद्रातील गणेशमूर्ती आफ्रिकेला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:28+5:302021-07-02T04:27:28+5:30
कल्याण : पश्चिमेतील वायले नगरातील नीलेश नखाते यांच्या कला केंद्रातील एक गणेशमूर्ती बुधवारी आफ्रिकेला पाठविण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या ...
कल्याण : पश्चिमेतील वायले नगरातील नीलेश नखाते यांच्या कला केंद्रातील एक गणेशमूर्ती बुधवारी आफ्रिकेला पाठविण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या कला केंद्रातून एक मूर्ती लंडन येथे पाठविण्यात आली होती.
बापगाव येथे राहणारे नखाते हे आठ वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करतात. ते दरवर्षी केवळ शाडूच्या १०० मूर्ती घडवतात. परंतु, कमी वेळेत जास्त मूर्ती तयार करणे शक्य नसल्याने ते अन्य ठिकाणांहून काही गणेशमूर्ती मागवितात. योगीधाम येथे राहणारे एक गणेशभक्त त्यांच्या कला केंद्रात आले. त्यांनी एक गणेशमूर्ती नखाते यांना तयार करण्यास सांगितली. त्यानुसार नखाते यांनी एक फुटाची मूर्ती वेळेत तयार केली. ते गणेशभक्त कामानिमित्त आफ्रिकेत असून, ते गणेश उत्सव तेथे साजरा करणार आहेत. त्यामुळे नखाते यांनी त्यांची मूर्ती बुधवारी पार्सल करून त्यांना पाठविली आहे. आपल्या हातून घडलेली गणेशमूर्ती परदेशात गेल्याचा नखाते यांना आनंद झाला आहे.
फोटो-कल्याण-गणेश
---------------------